हल्ली सोशल मीडियाद्वारे अनेकजण आपपली मते व्यक्त करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे सोशल मीडियाद्वारे त्यांची मतं मांडत असतात. यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री मनवा नाईक. मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मनवा नाईकला ओळखले जाते. फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक दिग्दर्शिका व निर्माती म्हणूनही मनवाने मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. (Manava Naik On Instagram)
मनवाने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटांत काम केले आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक यशस्वी निर्माती म्हणूनही मनोरंजन विश्वात तिची ख्याती आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व कामानिमित्त काही माहिती शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर करत तिची खंत व्यक्त केली आहे. मुंबईत हल्ली ठिकठिकाणी खोदकाम आणि बांधकाम केले जात आहे. त्यामुळे साहजिकच मुंबईत दिवसेंदिवस ध्वनी आणि वायु प्रदूषण वाढत आहे. मुंबईमध्ये प्रगतीच्या नावाखाली ह्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या “तुम्ही तुमच्या नवऱ्याला…”
यावर मनवाने तिच्या सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त करत एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने असे म्हटले आहे की, “हे पूर्णपणे निराशाजनक आहे परंतु वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम, रहदारी आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने मुंबई आता सर्वात वाईट शहर आहे. धुळीने थर लावलेल्या, इमारतींचे कुरूप ब्लॉक्स वरच्या बाजूला रचले जात आहेत. नवीन पायाभूत सुविधांच्या सबबीखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जाते.” यापुढे तिने असं म्हटले आहे की, “बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखी राहिली नाहीत. यानंतर आता रेस कोर्सचाही नंबर आहे. त्यामुळे हे सगळं पाहून मन दुखावलं गेलं आहे.” तसेच या खाली तिने ‘या पोस्टचा राजकारणाशी संबंध नाही’ अशी एक तळटीप दिली आहे.
आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये लगीनघाई! आयरा-नुपूर नंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्रीदेखील अडकणार विवाहबंधनात, तारीखही आली समोर अन्…
दरम्यान, या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “विकासाच्या नावाखाली आपण केवळ इमारतीचा बांधत आहोत आणि हा विकास आपल्याला एका अस्वास्थ्य जीवनाकडे नेत आहे, तुमच्यासारख्या लोकांकडून अशा सामाजिक समस्यांबद्दल बोलले जाणे हे खूपच चांगले आहे, मुंबई आणि कोकण किनारपट्टीची शांतता व हवामान चक्र बिघडवणाऱ्या सत्ताधारी सरकारचे आभार” अशा अनेक संमिश्र कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या फोटोखाली आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.