मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर तिच्या अभिनयाने व दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही क्रांती बऱ्यापैकी सक्रिय असते. अनेक हटके व्हिडीओ बनवून ती सोशल मीडियावर शेअरदेखील करत असते. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. सोशल मीडियावर बरेचदा ती तिचे अनुभव शेअर करताना दिसते. बरेचदा क्रांती तिचे वैयक्तिक आयुष्याबद्दल असलेले व्हिडीओ शेअर करते. (Kranti Redkar Post)
क्रांतीचे लेकीबरोबरचे अनेक रील व्हिडीओही शेअर करते. क्रांतीच्या लेकींचे गमतीशीर रील व्हिडीओ कायमच चर्चेत राहतात. त्यामुळे क्रांती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. क्रांतीने समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले आहे. समीर यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आलेल्या संकटावेळी क्रांतीने त्यांची खंबीरपणे साथ दिलेली पाहायला मिळाली. समीर यांच्याबरोबरचे ही ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते. तसेच अनेकदा समीर यांच्या कामाचे अपडेटही ती शेअर करताना दिसते.
अशातच क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये क्रांतीने तिच्या नवऱ्याने दिलेलं सर्वात चांगलं वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. या पोस्टमध्ये क्रांतीला गिफ्ट देत तिच्या नवऱ्याने तिरुपती बालाजीच दर्शन घडवलं आहे. यावेळी क्रांतीसह तिच्या दोन्ही लेकीही होत्या. एकूणच क्रांतीने कुटुंबियांसह तिरुपती बालाजी दर्शन घेतले. यावेळी मंदिराबाहेरच पोज देत त्यांनी काढलेले फोटो क्रांतीने शेअर केले आहेत.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी रुग्णालयात भरती, बेडवरील फोटोही केला शेअर, म्हणाली, “नक्की काय झालं हे…”
या फोटोंमध्ये क्रांतीने आणि तिच्या नवऱ्याने साऊथ इंडियन लूक केलेला पाहायला मिळाला. तर तिच्या लेकीही पारंपरिक अंदाजात दिसल्या. यावेळी क्रांतीचा पारंपरिक लूकही साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे. क्रांतीने तिच्या वाढदिवसाच्या दिवसांत तिरुपती बालाजीचे आशीर्वाद सहकुटुंब घेतलेले दिसले. ही पोस्ट शेअर करताच अनेक चाहत्यांनी या पोस्टला पसंती दर्शविली आहे. तर काहींनी या पोस्टवर क्रांतीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिलेल्या पाहायला मिळत आहेत.