सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला पॉर्न बघायला आवडतं…”, ‘अ‍ॅनिमल’ला उद्देशून अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मला ते करायला…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2023 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor arshad warsi said he liked animal movie but would never do that type of film

"मला पॉर्न बघायला आवडतं...", 'अ‍ॅनिमल'ला उद्देशून अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला "मला ते करायला..."

गेले काही दिवस रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचे सगळेच रेकॉर्डसदेखील मोडले आहेत. परंतु, चित्रपटात दाखवण्यात आलेल्या हिंसाचार व काही दृश्यांवर अनेक् समीक्षकांनी टीकाहे केली आहे. वेगवेगळ्या स्तरातून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. कलाविश्वापासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत आणि जाणकारांपासून ते अगदी सामान्य प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांनीच यावर आपली मतं व्यक्त केली आहेत. (Arshad Warsi Talk On Animal Movie)

अशातच बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने या चित्रपटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. अर्शदने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे अ‍ॅनिमल या चित्रपटाविषयीचे मत मांडले. यावेळी तो असं म्हणाला की, “सर्व गंभीर कलाकारांना या चित्रपटाचा तिरस्कार वाटला. पण मला मात्र हा चित्रपट आवडला. मी कोणत्याही चित्रपटाकडे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघतो. लोकांना काही सल्ले, उपदेश किंवा शिकवण्याची माझी अजिबात इच्छा नाही. चित्रपट हे फक्त मनोरंजनापुरतेच असते. त्यामुळे त्याच्याकडे फक्त मनोरंजन म्हणूनच पाहिले पाहिजे.”

View this post on Instagram

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

आणखी वाचा – लग्नानंतर सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ट्रोलिंगवर सुरुची अडारकर-पियुष रानडेचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, “इतरांच्या मतांमुळे…”

यापुढे त्याने असे म्हटले आहे की, “मी अ‍ॅनिमलसारख्या चित्रपटाचा कधीही भाग होणार नाही. कारण मला इतकी हिंसा किंवा अ‍ॅक्शन आवडत नाही. मला अ‍ॅक्शन ही पडद्यावर पाहायला आवडते. पण ते प्रत्यक्षात करायला आवडत नाही. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून मला जे बघायला आवडते. टेक एक एक अभिनेता म्हणून मला ते कधीही करायचे नाही. मला पॉर्न आवडते. पण मला ते करायचे नाही. “

आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचे चित्रपटात पदार्पण, लवकरच झळकणार मोठ्या पडदयावर, फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, मुन्नाभाई एम.बी.बी.एस. लोकप्रिय चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “२० वर्षे… हे अगदी कालच झाल्यासारखे वाटले. मुन्ना व सर्किटवर इतके प्रेम केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.” असं म्हणत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तसेच अर्शद लवकरच ‘वेलकम टु जंगल’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags: bollywood actorbollywood newsentertainmententertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Dunki vs Salaar

‘डंकी’ की ‘सालार’, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार?, प्रदर्शनापूर्वीच आकडेवारी समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.