सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष या कलाकार जोड्या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या. मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाआधीच्या तयारीलाही नुकतीच सुरुवात झाली आहे. मुग्धा-प्रथमेशचे हळदी समारंभाचे अनेक फोटोस सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यानंतर आता अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. (Mrunmayee Deshpande On Gautami Deshpande)
सिनेसृष्टीत लग्नाची धामधूम सुरु असताना यांत आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडणार असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली गौतमी देशपांडे. या मालिकेमुळे गौतमीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. गौतमी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची सख्खी बहीण आहे. मृण्मयी व गौतमी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या सोशल मीडियावर एकमेकींबरोबरचे अनेक गंमतीशीर व्हिडीओ शेअर करत असतात. गौतमीच्या लग्नाची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मृण्मयीने बहिणीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु असल्याच सोशल मीडियावरून शेअर केलं आहे.. मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती संगीत सोहळ्याची तयारी करत असल्याच कळत आहे.
गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी गौतमीने स्वानंदबरोबरचा शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आता गौतमी स्वानंदसह लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. स्वानंद तेंडुलकर हा ‘भाडिपा’चा व्हाइस प्रेसिडंट आहे. युट्यूबवरही त्याचा बोलबाला आहे. दरम्यान स्वानंदही एक कंटेट क्रिएटर असून सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होताना पाहायला मिळतात.