शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : क्रांती रेडकरच्या मुलींना उत्तम संस्कार देते तिची आई, या वयातही नातींसाठी तितकाच उत्साह व मजेशीर अंदाज, व्हिडीओ व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 7, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kranti redkar viral video

क्रांती रेडकरच्या आईचा व्हिडीओ व्हायरल

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. क्रांतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. क्रांती व तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. क्रांतीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असते. आपल्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओ ती शेअर करत असते. लेकींचे अनेक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. या व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते. (kranti redkar viral video)

अशातच नुकताच क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये क्रांतीची आईदेखील दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हात जोडून प्रार्थना कशी करायची? हे क्रांतीची आई नातींना शिकवत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रांती आईला म्हणते की, “छबिलची शाळेमध्ये पार्थना म्हणण्यासाठी निवड झाली आहे. तर प्रार्थना कशी म्हणायची ते सांग”, त्यावर क्रांतीची आई शिकवण्यास सुरुवात करते, म्हणते की, “तुला जर प्रार्थना करायची असेल तर हात जोडून कधीही तोंडावर ठेवायचा नाही. असं केलंस तर तु काय म्हणतेस ते समजणार नाही”.

आणखी वाचा – पंजाबी-हिंदी रॅपर हनी सिंहच्या आयुष्यावर येणार डॉक्युमेंट्री, या ओटीटी चॅनलवर लवकरच पाहता येणार, चाहते उत्सुक

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

पुढे क्रांतीची आई म्हणते की, “तुला प्रार्थना म्हणायची असेल तर तोंडाच्या खाली तुझ्या हाताचा नमस्कार असला पाहिजे”. हे ऐकून क्रांती म्हणते की, “बघितलत का? आम्ही सुद्धा असंच शिकलोय. आम्हाला पहिली शिकवण अशी मिळाली आहे. आम्हाला असच घडवलंय तुमच्या आजीने”.

आणखी वाचा – बहुचर्चित ‘पुष्पा’च्या तिसऱ्या भागात नक्की काय घडणार?, दुसऱ्या भागाचा शेवट पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, अशी असणार कथा

क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. एक नेटकरी म्हणाला की, “मला माझ्या आजीची आठवण आली”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “मला पण माझी आजी असंच शिकवायची”, त्यानंतर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “क्रांती तु नशीबवान आहेस की तुला अशी आई मिळाली”, अशा अनेक प्रकारच्या कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे

Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
ashwini kalsekar on children

अश्विनी काळसेकर कधीच आई का होऊ शकल्या नाहीत?, पहिल्यांदाच सांगितली संपूर्ण घटना, म्हणाल्या, "किडनीचा त्रास, वाईट वाटतं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.