सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. क्रांतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. क्रांती व तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. क्रांतीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असते. आपल्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओ ती शेअर करत असते. लेकींचे अनेक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. या व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते. (kranti redkar viral video)
अशातच नुकताच क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये क्रांतीची आईदेखील दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हात जोडून प्रार्थना कशी करायची? हे क्रांतीची आई नातींना शिकवत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रांती आईला म्हणते की, “छबिलची शाळेमध्ये पार्थना म्हणण्यासाठी निवड झाली आहे. तर प्रार्थना कशी म्हणायची ते सांग”, त्यावर क्रांतीची आई शिकवण्यास सुरुवात करते, म्हणते की, “तुला जर प्रार्थना करायची असेल तर हात जोडून कधीही तोंडावर ठेवायचा नाही. असं केलंस तर तु काय म्हणतेस ते समजणार नाही”.
पुढे क्रांतीची आई म्हणते की, “तुला प्रार्थना म्हणायची असेल तर तोंडाच्या खाली तुझ्या हाताचा नमस्कार असला पाहिजे”. हे ऐकून क्रांती म्हणते की, “बघितलत का? आम्ही सुद्धा असंच शिकलोय. आम्हाला पहिली शिकवण अशी मिळाली आहे. आम्हाला असच घडवलंय तुमच्या आजीने”.
क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. एक नेटकरी म्हणाला की, “मला माझ्या आजीची आठवण आली”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “मला पण माझी आजी असंच शिकवायची”, त्यानंतर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “क्रांती तु नशीबवान आहेस की तुला अशी आई मिळाली”, अशा अनेक प्रकारच्या कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे