शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सत्ता येते जाते पण…”, देवेंद्र फडणवीसांना उद्देशून क्रांती रेडकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “खुर्ची पणाला लावून ते फक्त…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 11, 2023 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
(marathi actress kranti redkar praised maharashtra deputy cm devendra fadnavis with video

"सत्ता येते जाते पण...", देवेंद्र फडणवीसांना उद्देशून क्रांती रेडकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, "खुर्ची पणाला लावून ते फक्त..."

आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या लेकींच्या अनेक करामतीही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे क्रांती ही तिच्या लेकींमुळे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगळच चर्चेत आली आहे. (Kranti Redkar Wankhede On Instagram)

नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते अजित पवार गटाबरोबर बसल्यामुळे राजकीय कल्लोळ झाला. यावर अनेकांनी आपापली मतं मांडत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची खुपच चर्चा झाली. याच संदर्भात क्रांतीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “नमस्कार, मी क्रांती रेडकर-वानखेडे. मला अनेक असे विषय असतात जे भावतात, त्याविषयी मला थोडं बोलावसं वाटतं. असाच एक विषय म्हणजे, नुकतंच लिहिलं गेलेलं एक पत्र. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे पत्र लिहिलं. या पत्रात असं लिहिलं होतं की, सत्ता येते-जाते, पण आपला देश महत्त्वाचा. अशी एक व्यक्ती जिच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत, जी जामिनावर सुटून आज बाहेर आहे, ती व्यक्ती विधानसभेत जाऊन बसू शकते का? हा प्रश्न लोकांच्या मनाला भेडसावत  होता, यामुळे लोक गोंधळले होते. देशद्रोहाचे आरोप असलेली व्यक्ती, महायुती सरकारमध्ये, ताठमानेने सत्ताधाऱ्यांबरोबर बसू शकते का? यावर खूपच गदारोळ झाला. या वादाला शांत करणारं असं हे एक पत्र होतं.”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “यातील सत्ता येते जाते पण देश महत्त्वाचा हे वाक्य मला फार आवडलं. कारण, आजच्या काळात एक मुरलेला राजकारण्यासाठी त्याची खुर्ची सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. ती खुर्ची पणाला लावून, ते फक्त देशाचा विचार करतात, असे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुमच्या मनातल्या जनहिताच्या भावनेला आमचा मानाचा मुजरा.” दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मालिका व समीर-क्रांती यांच्यात बरेच वाद-विवाद झाले होते. क्रांतीने नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यातील वाद मिटलेले नाहीत. अशातच या व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  

Tags: devendra fadnavisentertainment newskranti redkarmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
pooja sawant attend musafira music launch event paparazzi asked her where is jiju and actress blushed

Video : "जीजू कुठे आहेत?", प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, "ते लवकरच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.