शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“छबील-गोदोची आई आली…”, क्रांती रेडकरची ओळख नेमकी कशी आहे?, स्वतःच म्हणाली, “वानखेडेंची बायको…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 19, 2025 | 2:59 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kranti Redkar on her identity

"छबील-गोदोची आई आली…", क्रांती रेडकरची ओळख नेमकी कशी आहे?, स्वतःच म्हणाली, "वानखेडेंची बायको…"

Kranti Redkar on her identity : सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. सोशल मीडियावर क्रांती तुफान व्हायरल असते. नेहमीच ती काही ना काही शूट करत चाहत्यांना अपडेट देते. विशेषतः क्रांती तिच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ शेअर करताना दिसते. छबील-गोदोची आई म्हणून नेहमीच ती काही ना काही मजेशीर संवाद व्हिडीओ स्वरूपात शेअर करते. काही दिवसांपूर्वीच क्रांतीने सोहम बांदेकरच्या लग्नात तिच्या मुलींचा चेहरा दाखवला. आतापर्यंत क्रांतीने तिच्या दोन्ही मुलींचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र आता या लग्नात तिच्या दोन्ही मुली समोर आल्या. आणि अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

अभिनेत्री म्हणून क्रांती नेहमीच प्रसिद्ध झाली. पण आता सोशल मीडियावरील लेकींबरोबरच्या व्हिडीओमुळे क्रांती छबील-गोदोची आई म्हणून जास्त लोकप्रिय आहे. क्रांती रेडकरने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, “कोणती भूमिका तुला सगळ्यात जास्त आवडते आणि ती कायम तुझ्याबरोबर असावी असं वाटतं?”. त्यावर क्रांती म्हणाली, “मी सध्या ज्या भूमिकेत आहे ती आहे छबील-गोदोची आई. कुठेही गेले तरी छबील-गोदोची आई आली असं म्हणतात. ही माझ्यासाठी खूप खास ओळख आहे”.

आणखी वाचा – मुलगा झाला हो! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

पुढे ती म्हणाली, “व्यावसायिकदृष्ट्या आपली एक ओळख असते. एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपली एक ओळख असते. त्याचा मी आता अनेक वर्षे आनंद घेतला आहे. कारण मी वयाच्या १७ व्या वर्षी पहिलं व्यावसायिक नाटक केलं. इतक्या वर्षांचं काम आहेच. पण, एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून माझी झालेली ओळख आहे, ती मला आवडते”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा TWIST, २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य उघड; प्रोमो पाहून नेटकरी खुश, म्हणाले, “नशीब आता तरी सत्य कळेल…”

शेवटी क्रांती म्हणाली, “मला कुठेच असं वाटत नाही की त्यांची आई म्हणून मला ओळखतात का, मिस्टर वानखेडेंची बायको म्हणून मला ओळखतात का, असं मला वाटत नाही. काही स्त्रियांना त्याचा त्रास होतो. त्यांना असं वाटतं की माझी स्वतःची काही ओळख नाही का? माझं तसं काही नाही. मला ते आवडतं”, असं म्हणत क्रांतीने तिच्या ओळखीबाबत खुलासा केला.

Tags: entertainmentkranti redkarmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Akshaye Khanna

"मला मुलांना जन्म देण्यात रस नाही", लग्न, मुलं होण्यावर अक्षय खन्नाच भाष्य, म्हणालेला, "या वयात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.