सोमवार, ऑगस्ट 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलगा झाला हो! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 19, 2025 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bharti singh gave birth to baby boy

भारती-हर्षला पुन्हा पुत्ररत्नाची प्राप्ती

Bharti singh gave birth to baby boy: कॉमेडियन भारती सिंह अनेक दिवसांपासून गुडन्युजमुळे चर्चेत होती. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या कुटुंबियांसोबत स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेली होती. तिथेच तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. भारतीनं स्वित्झर्लंडमधून अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. अशातच ‘लाफ्टरक्वीन’ भारती सिंहने आनंदाची बातमी दिली आहे. भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली आहे.

आणखी वाचा: कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर पहिले पीईटी स्कॅन, वेदनेने त्रस्त आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला…

आज (१९ डिसेंबर) तिने गोंडस मुलाला जन्म दिला. गोलानंतर त्यांना पुन्हा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. आज सकाळीच तिला ‘लाफ्टर शेफच्या’ शूटिंगआधी तिला प्रसूती कळा सुरु झाल्या आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला दुसऱ्यांदा मुलगा झाला. ३ एप्रिल २०२२ रोजी भारतीला पहिला मुलगा झाला होता. त्याचं नाव लक्ष असं आहे. त्याला प्रेमाने त्यांनी गोला असं नाव ठेवलं. आता छोटा गोलाला त्याच्याहून चिमुकला भाऊ मिळाला आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया आईबाबा झाले आहेत. सध्या तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. भारतीने गुडन्यूज दिल्यानंतर चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. भारतीच्या दुसऱ्या मुलाचीही झलक पाहण्यासाठी चाहते खूपच आहेत. खरंतर भारतीने यावेळी मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. ‘मुलानंतर एक मुलगी तर असावीच घरात शिस्त राहते. गोला तर खूप उत्साहित आहे. गोला नंतर आता गोली हवी’ अशी तिने प्रतिक्रिया दिली होती. मुलीची इच्छा पूर्ण होऊ शकली नसली तरी दुसऱ्या बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. भारतीने वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharti Siingh (@bharti.laughterqueen)

नुकतंच भारतीचं डोहाळजेवण पार पडलं होतं. यावेळी अनेक टीव्ही कलाकार आले होते. अंकिता लोखंडे, ईशा मालवीया, ऋतिक धनजानी, एल्वेिश यादवसह अनेक कलाकारांची हजेरी होती. भारती सिंह आणि हर्षने अद्याप अधिकृतरित्या गुडन्यूज जाहीर केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर भारतीच्या दुसऱ्या डिलीव्हरीची चर्चा आहे.

आणखी वाचा: ‘KGF 2’ च्या सह-दिग्दर्शकावर दुःखाचा डोंगर, साडे-चार वर्षाच्या लेकाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, खेळता खेळता…

Tags: Bharti SinghBharti singh gave birth to baby boybollywood newsentertainmentharsh limbachiya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Actress Talk about Past Relationship
Entertainment

एक्स बॉयफ्रेंडने दिले होते सिगारेटचे चटके; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “आजही खुणा…”

ऑगस्ट 10, 2026 | 10:46 am
Jayanti 2 Teaser
Entertainment

सशक्त महिला पात्र असलेला ‘जयंती २’ येतोय, चित्रपटाच्या टिझरने वेधलं लक्ष, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 8, 2026 | 9:28 am
Next Post
Kranti Redkar on her identity

"छबील-गोदोची आई आली…", क्रांती रेडकरची ओळख नेमकी कशी आहे?, स्वतःच म्हणाली, "वानखेडेंची बायको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.