छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचबरोबर ती छान नृत्यांगणाही आहे. तिने ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्वदेखील बरंच गाजवलं होतं. या कार्यक्रमामुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतर तिचा सिनेसृष्टीतील वावर बराच कमी झालेला दिसला. त्यानंतर तिने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लवकरच सई आई होणार आहे. तिच्या आयुष्यात एका चिमुकल्या गोंडस बाळाची एन्ट्री होणार आहे. सध्या सई हा काळ इन्जॉय करताना दिसत आहे. नुकताच तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. याचे फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या व्हिडीओवर अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट करत तिला एक सल्ला दिला आहे. (kranti redkar comment on sai lokur video)
सईच्या डोहाळ जेवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. सईच्या मैत्रिणींनी मॉर्डन अंदाजात डोहाळ जेवण आयोजित केलं होतं. या मॉर्डन सोहळ्यात सई देखील मॉर्डनरित्या तयार झाली होती. याचे फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यातील एका व्हिडीओत सई तिचा हा काळ इन्जॉय करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.
सईने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकारांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. इतर कलाकारांसह अभिनेत्री क्रांती रेडकरनेही या व्हिडीओवर कमेंट करत तिला सल्ला दिला. क्रांती लिहिते की, ‘झोपून घे बाई भरपूर… तुला व तुझ्या येणाऱ्या छोट्या बाळाला खूप सारं प्रेम…’, अशी कमेंट करत तिने सईला या काळात भरपूर झोप घेण्याचं सूचवलं आहे. तिच्या कमेंटवर बऱ्याच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘कारण नंतर अजिबात झोप मिळत नाही’, अशी मजेशीर कमेंट करत त्याने सईला दिलेल्या सल्ल्याचं कारण स्पष्ट केलं. तर दुसऱ्या नेटकऱ्यानेही तिच्या कमेंटवर स्वतःची सहमत दर्शवत, ‘खरी गोष्ट आहे’ असं लिहित हसण्याचा इमोजी पाठवला आहे.