शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक बनली ‘या’ महागड्या मोबाईल कंपनीची ब्रॅंड अँबॅसेडर, आईने शेअर केली कौतुकास्पद पोस्ट, म्हणाली, “टॅलेंट असेल तर…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 10, 2024 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Kishori Godbole daughter become the brand ambassador of Apple company and she shared appreciation post for her

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक बनली Apple कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आईने लेकीसाठी लिहिली कौतुकास्पद पोस्ट

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोलेने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.  ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’  या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. आपल्या अभिनयाबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने आपल्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Kishori Godbole Daughter Apple Brand Ambassador)

किशोरीची मुलगी सईने आता एक नवी भरारी घेतली आहे. ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर माहिती शेअर केली. किशोरी गोडबोले ची मुलगी सई गोडबोले ही आता लोकप्रिय अ‍ॅप्पल या कंपनीचीची ब्रँड अँबेसिडर झाली आहे आणि लेकीच्या या कामगिरीबद्दल किशोरीने एक कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. किशोरीने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “सई माझी मुलगी Apple कंपनीची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे, ती गेल्या आठवड्यात Apple ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी लॉस एंजेलिस येथे गेली होती. माझ्या या मल्टिटॅलेंटेड लेकीने हा मोठा सन्मान मिळवला आहे”

View this post on Instagram

A post shared by Kishori Godbole (@kulkishori)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात, साधेपणाने केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “तुमच्याकडे टॅलेंट असेल तर, तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट साध्य करू शकता हे पुन्हा एकदा सईने सिद्ध करू दाखवलं आहे. अशीच पुढे जा, तुला आयुष्यात भरभरून यश मिळो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशी आहेस तशीच राहा. मला तुझा खूप खूप अभिमान आहे”. या पोस्टखाली अनेक चाहते मंडळींनी व कलाकारांनी कमेंट्स करत सईचे कौतुक केलं आहे, अभिमान वाटतो, अशीच पुढे जा, खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम छोटा पुढारीने थेट मुंबई गाठत घेतली निक्की-अरबाजची भेट, दोघांनी घन:श्यामला दिलं ‘हे’ आश्वासन, म्हणाले…

दरम्यान, सई गोडबोले आघाडीची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून देखील ओळखली जाते. आजची तरुणाई सईकडे मल्टीटॅलेंटेड इन्फ्लुएन्सर म्हणून पाहते. तिच्या सोशल मीडियावरच्या रिल्स खूप व्हायरल होत असतात.  . सई वेगवेगळ्या भाषा त्या विशिष्ट अंदाजात बोलू शकते. शिवाय तिचा आवाजही खूप छान आहे. ती डान्सही उत्तम करते. अशातच तिच्या नुकत्याच कामगिरीबद्दल सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू आहे

Tags: Kishori GodboleKishori Godbole Daughter Apple Brand AmbassadorKishori Godbole Daughter Sai Godbolemarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navri Mile Hiltlerla serial updates AJ is going to be arrested and leela in trouble

Navri Mile Hiltlerla मालिकेत नवा ट्विस्ट, श्वेतामुळे एजेंना होणार अटक, लीला वाचवणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.