शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hiltlerla मालिकेत नवा ट्विस्ट, श्वेतामुळे एजेंना होणार अटक, लीला वाचवणार का?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 10, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hiltlerla serial updates AJ is going to be arrested and leela in trouble

Navri Mile Hiltlerla मालिकेत एजेंना होणार अटक, लीला वाचवू शकणार का?

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी होतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एजे व लीला यांच्यात आता कुठे तरी प्रेम बहरत असतानाच आता एजेंवर मोठं संकट आलं आहे. एजेंना अटक होणार असल्याचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. (Navri Mile Hiltlerla Serial Updates)

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, श्वेता आणि तिची आई एजेच्या घरी आल्या आहेत. श्वेताची आई म्हणते, “तुमच्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.” त्यानंतर “जर एजेंना माझ्याशी लग्न करायचं नसेल, तर मलासुद्धा जगण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये”, असे म्हणून श्वेता जीव देण्याचा प्रयत्न करते. ते पाहताच एजे ती औषधाची बाटली फेकतो. श्वेता पडत असताना एजे तिला धरतो. श्वेता म्हणते, “तुमच्याशी लग्न करता आलं नाही; पण तुमच्या मिठीत मरता येतंय मला.” त्यानंतर ते श्वेताला घेऊन जातात. 

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक बनली ‘या’ महागड्या मोबाईल कंपनीची ब्रॅंड अँबॅसेडर, कौतुकास्पद कामगिरी पाहून भारावली आई, म्हणाली, “टॅलेंट असेल तर…”

पुढे एजेच्या घरी पोलिस येतात. यावेळी आजी रडत आहे आणि ती दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना समजावत आहेत. यादरम्यान, लीला तिच्या माहेरी आहे. लीला माहेरी असताना तिच्या घरी पत्रकार येतात आणि ते एजेंच्या अटकेविषयी लीलाला विचारतात. “एजेमुळे एका मुलीने आत्महत्या केली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आता ते जेलमध्ये आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे?” असं पत्रकार लीलाला विचारतात. पत्रकारांचे ही बोलणे ऐकल्यानंतर तिला धक्का बसला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम छोटा पुढारीने थेट मुंबई गाठत घेतली निक्की-अरबाजची भेट, दोघांनी घन:श्यामला दिलं ‘हे’ आश्वासन, म्हणाले…

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजे आणि श्वेताचे लग्न ठरलेले असते. मात्र, लीलाची बहीण रेवतीला किडनॅप करून, तिला एजेबरोबर जबरदस्तीने लग्न करायला सांगितले जाते. लीला श्वेताला बेशुद्ध करून, स्वत: तिच्या जागी बसते आणि एजेबरोबर लग्न करते. त्यामुळे आता लीला एजेंना सुखरूप सोडवणार का? यादरम्यान दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे मालिकेच्या आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे  

Tags: Marathi Serial NewsNavri Mile Hiltlerla Marathi SerialNavri Mile Hiltlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Tharala Tar Mag serial update Arjun will bring Madhubhau and Sayali meeting on the occasion of Diwali

Tharala Tar Mag : दिवाळीनिमित्त अर्जुनकडून सायलीला खास गिफ्ट, मधूभाऊंची सुटका करणार अन्...; अखेर बाप-लेकीची भेट होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.