मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोलेने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. आपल्या अभिनयाबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने आपल्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Kishori Godbole Daughter Apple Brand Ambassador)
किशोरीची मुलगी सईने आता एक नवी भरारी घेतली आहे. ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर माहिती शेअर केली. किशोरी गोडबोले ची मुलगी सई गोडबोले ही आता लोकप्रिय अॅप्पल या कंपनीचीची ब्रँड अँबेसिडर झाली आहे आणि लेकीच्या या कामगिरीबद्दल किशोरीने एक कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. किशोरीने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “सई माझी मुलगी Apple कंपनीची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे, ती गेल्या आठवड्यात Apple ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी लॉस एंजेलिस येथे गेली होती. माझ्या या मल्टिटॅलेंटेड लेकीने हा मोठा सन्मान मिळवला आहे”
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात, साधेपणाने केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “तुमच्याकडे टॅलेंट असेल तर, तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट साध्य करू शकता हे पुन्हा एकदा सईने सिद्ध करू दाखवलं आहे. अशीच पुढे जा, तुला आयुष्यात भरभरून यश मिळो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशी आहेस तशीच राहा. मला तुझा खूप खूप अभिमान आहे”. या पोस्टखाली अनेक चाहते मंडळींनी व कलाकारांनी कमेंट्स करत सईचे कौतुक केलं आहे, अभिमान वाटतो, अशीच पुढे जा, खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, सई गोडबोले आघाडीची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून देखील ओळखली जाते. आजची तरुणाई सईकडे मल्टीटॅलेंटेड इन्फ्लुएन्सर म्हणून पाहते. तिच्या सोशल मीडियावरच्या रिल्स खूप व्हायरल होत असतात. . सई वेगवेगळ्या भाषा त्या विशिष्ट अंदाजात बोलू शकते. शिवाय तिचा आवाजही खूप छान आहे. ती डान्सही उत्तम करते. अशातच तिच्या नुकत्याच कामगिरीबद्दल सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू आहे