Star Pravah New Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनी नेहमीच आशयघन मालिका घेऊन येत असते. या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून ही या वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ती मालिका म्हणजे अबोली. गौरी कुलकर्णी, सचित पाटील, शर्मिष्ठा राऊत ही कलाकार मंडळी या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या गेल्या तीन वर्षात मालिकेत खूप रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार या मालिकेत आले आणि गेले मात्र मालिकेच्या कथानकामुळे अजूनही ही मालिका तग धरुन आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक मोठं वळण येणार आहे. मालिकेत दोन नव्या पात्रांची एंट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.
‘अबोली’ मालिकेत आता दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मधील चर्चेत असलेली स्पर्धक या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रेक्षकांची लाडकी जान्हवी किल्लेकर. जान्हवी ‘बिग बॉस मराठी’नंतर आता अबोली मालिकेतून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे.
या मालिकेत ती पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव दीपशिखा भोसले असं आहे. तर, जान्हवीच्या बरोबर आणखी एका अभिनेत्रीने या ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना या दोन नव्या पात्रांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. जान्हवीसह या मालिकेत अभिनेत्री मयुरी वाघची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी मयुरीने ‘अस्मिता’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘लव्ह लग्न लोचा’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तर जान्हवीने ‘बिग बॉस मराठी’आधी ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारली होती.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, इन्स्पेक्टर दीपशिखा चौकशी करताना संशयिताला पट्ट्याने मारत असते. इतक्यात अबोली येऊन दीपशिखाला अडवते आणि “अंकुश सरांच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्याची ही पद्धत नाहीये” असं तिला सांगते. यावर, “ही आता अंकुशची नव्हे तर इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटीलची चौकी आहे” असं उत्तर दीपशिखा देते. पुढे, अबोली म्हणते, “कोणाचीही चौकी असो, जो कायद्याने चालणार नाही त्याला अबोली वकिलीचा हिसका दाखवणार”.