शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 30, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
हेमल इंगळेच्या लगीनघाईला सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी, व्हिडीओ व्हायरल

हेमल इंगळेच्या लगीनघाईला सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी, व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळेच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. हेमलने ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. कतंच तिचं केळवण पार पडलं. कोल्हापुरात अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचे खास फोटो हेमलने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “केळवणाला दणक्यात सुरुवात…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यानंतर आता तिच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. (hemal ingle pre wedding rituals started)

अभिनेत्री हेमल इंगळेचा नुकताच मुहूर्तमेढ सोहळा संपन्न झाला आहे आणि याची खास झलक तिच्या बहिणीने शेअर केली आहे. या सोहळ्यासाठी हेमलने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. गडद निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने, मुंडावळ्या आणि  हातात हिरवा चुडा या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. हेमलने या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचा व्हिडीओ शेअर करताना एक खास पोस्टदेखील लिहिली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Heymal Ingley (@hemalingle)

आणखी वाचा – Video : …अन् चालू नाटकातच शरद पोंक्षे सर्वकाही विसरले, पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊन रडू लागले आणि…; व्हिडीओ व्हायरल

या पोस्टमध्ये हेमलने असं म्हटलं आहे की, “गणपती बाप्पाची प्रार्थना करुन एका नव्या प्रवासाची आज मी सुरुवात करत आहे. खरंतर, हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी खूपच भावनिक क्षण आहे. कारण, मुली सासरी जाताना इतक्या भावुक का होतात याचं गांभीर्य मला आधी कधीच जाणवलं नव्हतं. पण, आता मला समजत आहे की, स्त्रियांचं आयुष्य सोपं नसतं. आपलं घर, आजवरचं आयुष्य सगळं सोडून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी एक नवं कुटुंब माझी आतुरतेने वाट पाहतं आहे आणि त्यासाठीही मी नक्कीच उत्सुक आहे”.

आणखी वाचा – मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, दरम्यान, हेमलने आता या खास सोहळ्याचे क्षण शेअर केल्यानंतर चाहत्यांना अभिनेत्री लग्नबंधनात कधी अडकणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक जण तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हेमलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा २’या चित्रपटात पाहायला मिळाली होती

Tags: hemal inglehemal ingle pre wedding rituals startedhemal ingle wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
sushma andhare on prajkata mali

"प्राजक्ताची पत्रकार परिषद राजकीय हेतु", सुषमा अंधारेंचा प्राजक्ता माळीवर राग, म्हणाल्या, "करुणा यांच्यावर का नाही बोलली? आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.