रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याला चांगलं खेळण्याची गरज”, सूरज चव्हाणला गायत्री दातारचा सल्ला, म्हणाली, “पहिला चांगलं खेळायचा आता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 7, 2024 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
gayatri datar on suraj chavhan

गायत्री दातारने व्यक्त केले सूरज चव्हाणबद्दलचे मत

मराठी मनोरंजन क्षेत्रातील गायत्री दातार ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिच्याबरोबर सुबोध भावे मुख्य भूमिकेमध्ये होता. यामध्ये दोघांच्याही वयात असलेलं अंतर आणि तरीही असलेलं प्रेम यावर ही मालिका अवलंबून होती. या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तिच्या भूमिकेचेदेखील कौतुक केले होते. सध्या ती ‘अबीर गुलाल’ या मालिकेमध्ये दिसून येत आहे. यामध्ये तिची नकारात्मक भूमिका असलेली पाहायला मिळत आहे. या भूमिकेलादेखील चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. (gayatri datar on suraj chavhan)

सध्या ‘बिग बॉस मराठी’ मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. सध्या यामध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, आर्या जाधव, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी, अरबाज पटेल हे सदस्य सहभागी झाले आहेत. सगळ्यांचाच खेळ खूप पसंत केला जातो. यावरुनच गायत्रीने भाष्य केले आहे. गायत्री ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. यावरुन तिने या पर्वातील स्पर्धकांवर भाष्य केले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “प्रेम खोटं, तिनेच त्याला गुंतवून ठेवलं आणि…”, निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाजच्या वडिलांचं मोठं भाष्य, म्हणाले, “कमिटेड असूनही…”

गायत्रीने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिला विचारले की, “तुझा आवडता सदस्य कोणता?”, यावर तिने उत्तर दिले की, “अभिजीत सावंत हा माझा आवडता स्पर्धक आहे. मी नेहमीच त्याला पाठिंबा देईन. तो मध्ये डगमगला होता पण आता चांगला खेळ खेळत आहे. तसेच मला सूरजचा खेळदेखील आवडतो. पण आता सूरजला त्याचा खेळ चांगला खेळण्याची गरज आहे. पहिल्यांदा तो जितका चांगला खेळायचा तितका त्याचा आता खेळ दिसून येत नाही. पण येणाऱ्या आठवड्यात तो चांगला खेळेल अशी अपेक्षा आहे”.

आणखी वाचा – “त्याने एकट्याने खेळायला हवं आणि…”, अरबाज पटेलच्या वडिलांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “त्याला संधी मिळाली त्यामुळे…”

नंतर तिला विचारले की, “तू स्पर्धकांना कोणता सल्ला देशील?”, त्यावर ती हसून म्हणाली की, “मी कोणालाही काहीही सल्ले देणार नाही”. दरम्यान गायत्रीच्या व्यक्तव्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Tags: bigg boss marathigayatri datarsuraj chavhan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Suraj Chavan tells his filmy lovestory see the details

Bigg Boss Marathi : "मी तिला बघायचो, ती शायनिंग मारत…", सूरज चव्हाणने सांगितली त्याची लव्हस्टोरी, म्हणाला, "आमचं वाईला शूट असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.