एखादा कलाकार त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायला यशस्वी होतो. या हरहुन्नरी कलाकारांच्या यादीत एक नाव हमखास घेतलं जातं ते म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार गौरव मोरे. आपल्या अभिनयाच्या ताकदीवर केवळ हास्यजत्रेच नाही तर हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये देखील गौरवने जम बसवला. हास्यजत्रेतील विशिष्ठ अभिनयशैलीसाठी गौरव ओळखला जातो. नुकतीच हास्यजत्रेची टीम परदेश दौऱ्यासाठी गेली होती. परदेशात देखील प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवून हास्यजत्रेची टीम मायदेशी परतली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली. परंतु हास्यजत्रेतील कलाकरांना मनोरंजनासाठी एक आगळावेगळा विषय मिळाला तो म्हणजे अभिनेता गौरव मोरेचा बदललेला लुक.(gaurav more prasad oak new movie)
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत प्रत्येक स्किटमध्ये आपल्या ठराविक पद्धतीत एन्ट्री घेणारा गौरव आता मात्र त्या अंदाजात एन्ट्री घेताना दिसणार नाही त्याचं कारण असं कि आधी आपल्या केसांच्या विशिष्ट स्टाईलसाठी ओळखला जाणारा गौरव आता केसांची स्टाईल बदलून हास्यजत्रेत परतला आहे. त्याच्या नवीन लुकची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसते. हास्यजत्रेतील त्याचे सहकलाकार देखील त्याच्या नवीन लूकची चर्चा करताना दिसतायत. अशातच त्याने लुक का बदलला याचा खुलासा इट्समज्जाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.
हे देखील वाचा – फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने केस का कापले?, स्वतःच सांगितलं कारण, म्हणाला, “त्यावेळी रडलो पण…”
गौरव मोरे लवकरच ‘अंकुश’ या चित्रपटात झळकणार आहे त्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत गौरवला लुक का बदलला असा प्रश्न विचारण्यात आला. ‘परिनिर्वाण’ या प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात गौरव देखील झळकणार असल्याचं त्याच्या उत्तरातून स्पष्ट झालं. त्यासाठी हा लुक असा ठेवला असल्याचं देखील त्याने स्पष्ट केलं.(gaurav more in parinirvaan)
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही म्हणून अनुपम खेर यांचा संताप, ट्वीट करत म्हणाले, “माझ्या अभिनयासाठी मला…”
गौरवने काही दिवसांपूर्वी त्याच्या एका हिंदी चित्रपटाचीदेखील घोषणा केली होती. ‘सागी’असं त्याच्या नवीन हिंदी चित्रपटाचं नाव असल्याचं देखील समोर आलं आहे. याआधी गौरवचे स्टायलिश केस ही देखील त्याची एक वेगळी ओळख होती. “मी केस कापताना रडत होतो” असं देखील गौरवने या मुलाखती सांगितलं आहे. हास्यजत्रेतच्या पहिल्या स्किटमधेच माझ्या नवीन लुक वर विनोदाचे पंच देखील पडले असं गौरव म्हणाला.(gaurav more movies)