सोशल मीडियास्टार, लावणी डान्सर अशी गौतमी पाटीलची ओळख आहे. आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर गौतमी आज तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. सध्या तरुण वर्गामध्ये गौतमी पाटील या नावाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात. सोशल मीडियावर गौतमीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा गौतमीला तिच्या नृत्यामुळे ट्रोल केलं जातं. दरम्यान, सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Gautami Patil Video)
गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये गौतमी मराठी कलाकारांना भेटल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री अलका कुबल यांना भेटली आहे. तसंच अभिनेत्री सई ताम्हणकरलाही भेटली आहे. त्याचबरोबर गौतमी अभिनेता संजय खापरे व शिव ठाकरे यांनाही भेटली. “सगळ्यांना भेटून खुप छान वाटले” असं म्हणत गौतमीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये गौतमी अलका कुबल यांच्याबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. तसंच अभिनेत्री अलका कुबल गौतमीचे कौतुकही करत आहेत. तसंच गौतमी सई, संजय व शिव यांच्याबरोबरही माजमस्ती व गप्पा मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच गौतमी व इतर कलाकारांच्या साधेपणाचे अनेकांनी कौतुकही केलं आहे.
आणखी वाचा – लेकीच्या वाढदिवसालाही अभिषेक बच्चन नाहीच, ऐश्वर्या रायने एकटीने केलं सेलिब्रेशन, कौटुंबिक वाद आणखीनच वाढला
गौतमीच्या या व्हिडीओखाली अनेकांनी “साधी माणसं नेहमी पुढे जातात”, “भविष्यासाठी अभिनंदन”, “खूप गोड”, “आज पाटील यांना गौतमीचा अभिमान वाटला पाहिजे. कारण ती इथपर्यंत कोणाच्याही आधाराशिवाय पोहोचली आहे”, “सबसे कातील गौतमी पाटील”, “गौतमी तू स्वतःमध्ये बदल केला आहेस, तुला झालेल्या अनेक विरोधानंतर आज तू हे यश पाहतेस आणि तुला असं आनंदी पाहून आम्हालाही आनंद झाला आहे” अशा अनेक कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे