Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही झी मराठीवरील मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कधी एजे-लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात एजेने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होताना दिसत आहे. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे यशच्या लग्नाचा. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे. पण एजेंच्या मनात काही वेगळंच आहे. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे आता एजे श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
यश व रेवती यांचे लग्न होणार असल्याचे वचन लीलाने रेवती व तिच्या आईला दिलं आहे. त्यानुसार जेव्हा एजे यश व रेवतीच्या लग्नाबद्दल सर्वांना सांगतात तेव्हा लीलाला यशने खरं काय ते सांगावं असं वाटतं. यश व रेवती यांच्या लग्नामुळे लीला एजेंच्या विरोधात जाणार आहे असं दिसत आहे. लीला यश व श्वेता यांच्या साखरपुड्याची तयारी करायला सांगत आहेत. नुकत्याच झालेल्या भागात लीलाने “यश आणि श्वेता यांचा साखरपुडा तुम्ही कसा करता हेच मी बघते” असं म्हणाली. यावर एजे तिला “काहीही करुन हा साखरपुडा होणारच” असं सांगतात. यावर लीलाला एजेंना आव्हान देते आणि म्हणते की, “मी पण तुम्हाला चॅलेंज देते की, काहीही झालं तरी तुम्ही यश व रेवतीचं नातं तोडू शकणार नाही”.
आणखी वाचा – लेकीच्या वाढदिवसालाही अभिषेक बच्चन नाहीच, ऐश्वर्या रायने एकटीने केलं सेलिब्रेशन, कौटुंबिक वाद आणखीनच वाढला
अशातच आता यात नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे यश व रेवती दोघांनी त्यांचं प्रेम नाकारलं आहे, दोघांनी माघार घेतली आहे. मलिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये लीला एजेंना म्हणते की, “तुम्ही त्या दोघांशी बोललात का? त्यांनी तुमचं प्रेम कबूल केलं का? मी सांगत होते त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे”. यावर एज त्यांना लीलाला असं म्हणतात की, “माझं दोघांशी बोलून झालं आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही. ते फक्त चांगले मित्र आहेत” आणि हे ऐकून लीला धक्काच बसतो.
त्यानंतर लीला यशला याबद्दल विचारते तर यश तिला असं म्हणतो की, “माझा निर्णय झाला आहे. मी श्वेताबरोबर लग्न करायला तयार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे”. त्यानंतर लीला रेवतीलाही फोन करुन विचारते. तेव्हा रेवतीही तिला असं म्हणते की, “यश आणि श्वेताचे लग्न झाले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही”. त्यामुळे आता यश व रेवती दोघे खोटं का बोलत आहेत? त्यांनी एजेंना खोटं का सांगितलं? हे लीला शोधून काढणार आहे. त्यामुळे लीला रेवती-यशचं तुटणारं नातं वाचवू शकेल का? हे आगामी भागांमधून पाहायला मिळणार आहे.