मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमणी’सारख्या अनेक मराठी व ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठीतल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांशी अश्विनी भावेंचं नाव जोडलं गेलं आहे. त्यातलीच एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘वजीर’.
‘वजीर’ या चित्रपटात अश्विनी भावे यांच्याबरोबर ज्येष्ठ दिवगंत अभिनेते विक्रम गोखलेदेखील होते. यांसह अनेक दिग्गज मंडळी या चित्रपटात होती. या चित्रपटातील रेप सीन करतानाचा अनुभव अश्विनी भावे यांनी नुकताच शेअर केला आहे. तसेच त्यांनी हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शकासमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंच्या आठवणी सांगताना त्या भावुकही झाल्या.
आणखी वाचा – इंद्राणीकडूनच नेत्राच्या बाळाला धोका, देवी आईच्या लेकींमध्येच फूट पडणार, रुपालीची नवीन खेळी यशस्वी होणार का?
याबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “’वजीर चित्रपट करण्याआधी मी ‘पुरुष’चित्रपटाचे शूटिंग करुन आले होते. ज्यामध्ये जवळपास १५ ते २० मिनिटांचा एक रेप सीन शूट केला. १५ दिवस त्याचं शुटींग सुरु होतं. त्यानंतर मला वाटलं की, आता मला रेप सीन असलेले चित्रपट करायचे नाहीत. आता मी त्या मनस्थितीच नाही आणि ‘वजीर’मध्ये रेप सीन होता. तेव्हा मी त्या चित्रपटाला नाही म्हटलं होतं. हे ऐकून तो दिग्दर्शकही खूप नाराज झाला”.
आणखी वाचा – आर माधवन झाला मुंबईकर, ‘या’ ठिकाणी घेतलं नवीन आलिशान घर, एकूण किंमत आहे…
पुढे त्यांनी म्हटलं की, “त्यावेळी विक्रमने मला विचारलं की, अश्विनी काय झालं, हा चित्रपट तू का करत नाही आहेस? मी विक्रमला सगळं सांगितलं, की मी आता त्या मनस्थितीतच नाही. ते पुन्हा पुन्हा माझ्याकडे येऊ लागले. शेवटी मी त्या दिग्दर्शकाला म्हटलं, की जर माझ्या साडीच्या पदराची पीनही न काढता रेप सीन शूट करता येत असेल, तरच मी ही चित्रपट करेन. त्यावर त्या दिग्दर्शकानेही होकार दिला. जेव्हा जेव्हा तुमच्या कामात आव्हानं येतात, त्यावेळी तुम्ही ज्या पद्धतीने मार्ग काढता, त्याला खरी क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता) म्हणतात, जी त्या चित्रपटात आहे”.