रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दिया और…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मध्यरात्रीच मित्राने काढले होते घराबाहेर, सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “त्या रात्री…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 26, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
deepika singh life

‘दिया और…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मध्यरात्रीच मित्राने काढले होते घराबाहेर, सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “त्या रात्री…”

टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ ही लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. संध्या व सूरज ही जोडी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. या मालिकेत संध्याची भूमिका अभिनेत्री दीपिका सिंहने केली होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मात्र मनोरंजन क्षेत्रामधील दीपिकाचा प्रवास खूप खडतर होता. त्याबद्दल अनेकदा मुलाखतीमधून तिने सांगितले आहे. बालपण ते यशस्वी अभिनेत्री असा तिचा प्रवास हा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. (deepika singh life)

२०११ साली ‘दिया और…’ या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवली. दीपिकाने या मालिकेतून चांगलेच नाव कमावले. मात्र अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. लहानपणापासून गरीबीचा सामनादेखील करावा लागल्याचे तिने सांगितले आहे. आज २६ जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याशी निगडीत काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एका मित्राच्या घरी असताना त्याने अर्ध्या रात्री घराबाहेर काढल्याचे सांगितले आहे. ‘पिंकविला’शी बोलताना तिने याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.

आणखी वाचा – विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी भावे भावुक, ‘वजीर’मधील ‘त्या’ सीनची आठवण सांगत म्हणाल्या, “मी त्या मनस्थितीत…”

View this post on Instagram

A post shared by Deepika Singh (@deepikasingh150)

दीपिकाने सांगितले की, “आमचे सधन कुटुंब होते. मात्र व्यवसायात अडचणी यायला सुरवात झाल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली. एकदा असे झाले की माझ्या आई-वडिलांकडे माझ्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला होता. तुमच्याकडे पैसे नसतील तर तिला शिक्षण  घेण्यासाठी कशाला पाठवता? असेही मुख्याध्यापक म्हणाले होते”.

आणखी वाचा – ‘येड लागलं…’ मालिकेतून जय दुधाणेची एक्झिट, पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाला, “बाबा गेले आणि…”

पुढे ती म्हणाली की, “आर्थिक संकट असतानाही मी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले. कुटुंबाची इच्छा नसताही ती करिअर करण्यासाठी मुंबईमध्ये आली. मी मुंबईमध्ये आल्यानंतर एका मित्राच्या घरी राहत होते. पण एक दिवस अचानक त्याने मला अर्ध्या रात्री घरातून बाहेर काढले. त्यामुळे नक्की काय करावं हे समजत नव्हतं. पण असे असतानाही मी संघर्ष केला आणि मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण केलं”.दीपिकाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर २०१४ साली दिग्दर्शक रोहित राज गोयलबरोबर लग्न केले. त्यानंतर मी २०१७ साली त्यांना पहिला मुलगा झाला. तसेच सध्या ती ‘मंगल लक्ष्मी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहे.   

Tags: childhooddeepika singhtelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Shubhankar Tawde On Bigg Boss

शुभंकर तावडे 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये प्रवेश करणार?, पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला, "हा सीझन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.