झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. वेगळा विषय, वेगळा आशय आणि हटके कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच उतरली आहे. नेत्रा, विरोचक, रुपाली, इंद्राणी या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. कलाकारांच्या अभिनयामुळे व कथेमुळे मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक मालिकेत खूपच गुंतले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांत मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नेत्राचे गरोदर दाखवण्यात आले आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय खूपच आनंदी होते.
पण तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच एक अंश आहे हे कळताच सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. आधी तिला याबाबत माहिती नसते. मात्र नुकत्याच झालेल्या भागातून तिच्या पोटातील बाळ हे विरोचकाचे अंश असल्याचा उलगडा झाला आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. मात्र नेत्रा व इंद्राणी त्रिनयना देवीवर विश्वास ठेवत तिच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे या परिस्थितीत खचून जात नाहीत. पण आता मालिकेत येणाऱ्या एका नवीन वळणामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश असल्याने राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला गर्भपात करायला सांगत आहेत. मात्र नेत्राचा आईपणाचा पहिलाच अनुभव असल्याने ती गर्भपात करण्यास विरोध करत आहे. एकीकडे रुपाली नेत्राला तिच्या पोटात विरोचकाचा अंश असल्यावरून तिला सतत डिवचत आहे. तर दुसरीकडे इंद्राणी, अद्वैत सह राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला तिचे बाळ नष्ट करण्यासाठी सांगत आहेत. अशातच मालिकेचा नुकताच आलेला प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये रुपाली नेत्राच्या पोटावर हात ठेवत तिला इंद्राणीविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या नवीन प्रोमोमध्ये रुपाली नेत्राच्या पोटावर हात ठेवत “या घरात तुझ्या पोटातील बाळाला कुणी ईजा पोहोचवणार असेल तर ती इंद्राणी आत्या आहे” असं म्हणते. यावर इंद्राणी विरोचकाच्या या नवीन डावाबद्दल घरच्यांना सांगते. तसंच ती नेत्राच्या खोलीतील बाळाचा फोटोही फाडून टाकते. याचा नेत्रा तिला जाब विचारते. तेव्हा इंद्राणीही “मी तो फोटो फाडून टाकला” असं म्हणते. त्यामुळे दुःखी व बाळाच्या काळजीने व्याकुळ झालेली नेत्रा इंद्राणीला “मातृत्वाची भावना काय असते, हे तुम्हाला कळणार नाही” म्हणते.
आणखी वाचा – मेष, मिथुन व मीन राशीच्या लोकांसाठी शुक्रवार फलदायी, मनातील इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या…
दरम्यान, इंद्राणी व नेत्रा या विरोचका विरुद्ध लढणाऱ्या देवीआईच्या लेकी आता एकमेकांविरुद्धच उभ्या राहणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कायम एकमेकींबरोबर असणाऱ्या देवीआईच्या लेकींमध्येच आता फूट पडली आहे. त्यामुळे मालिकेत आता काय नवीन वळण येणार? नेत्रा तिच्या बाळाची सोडवणूक कशी करणार? देवीआई नेत्राच्या मदतीला धावून येणार का? की या सगळ्यात विरोचक त्याचा डाव साधणार हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.