शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चार दिवस सासू’मुळे जुळलं, खेकडा देऊन प्रपोज, १७ वर्षांचा संसार अन्…; श्वेता शिंदेंची हटके लव्हस्टोरी

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 2, 2024 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress and producer Shweta Shinde husband shares their love story in a special Diwali Padwa interview with Itsmajja

मराठी अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे व नवरा संदीप भन्साळी यांची हटके लव्हस्टोरी

‘अवंतिका’, ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून अभिनेत्री मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली. सध्या झी मराठीवरीलच ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा त्या सांभाळत आहे. मनोरंजन विश्वात अभिनेत्री व निर्माती म्हणून लोकप्रिय असणाऱ्या श्वेता शिंदे सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच दिवाळी पाडवा निमित्त अभिनेत्रीने नवऱ्यासह ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर नवरादेखील होता. (Shweta Shinde and Sandeep Bhansali Lovestory)

दिवाळी पाडवा निमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर झालेल्या खास संवादात दोघांना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल विचारण्यात आले. यावेळी श्वेता यांच्या नवऱ्याने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल असं म्हटलं की, “आम्ही दोघे एका सेटवर भेटलो. पहिल्या दिवशीच आमचं भांडण झालं. श्वेताच्या मित्राला भूमिका मिळाली होती. पण त्याला शेवटच्या क्षणी चॅनेलने काढलं. मग मला आणलं गेलं. मी ऑडिशन दिली. माझी कास्टिंग झाली. पहिल्या दिवशी मला यायला उशीर झाला. मग ही चिडली. त्यावर मी काय तरी बोललो आणि मग राडा झाला. त्यानंतर चार दिवसांनी श्वेताचा वाढदिवस होता. तेव्हा मी तिच्यासाठी केक मागवला. पण तिने याबद्दल काहीही माहीत नव्हतं. तिने केक कापला आणि सेलिब्रेशन झालं. अशी थोडी फिल्मी वाटणारी लवहस्टोरी होती”.

आणखी वाचा – Video : पाय धुतले, पाया पडली, अन्…; लक्ष्मीपूजनाला जान्हवी किल्लेकरने केली सासूबाईंची पूजा, नेटकऱ्यांकडून कौतुक

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “पुन्हा काही दिवसांनी पुन्हा आमची भेट झाली. मी हिंदी मालिकेचे शूटिंग करत होतो आणि श्वेता ‘चार दिवस सासूचे’ या मराठी मालिकेचे शूटिंग करत होती. तेव्हा आम्ही भेटलो आणि बोलत होतो, तेव्हा मालिकेच्या दिग्दर्शकाने आम्हाला पहिलं आणि तिला माझ्याबद्दल विचारलं. त्यानंतर आम्ही ‘चार दिवस सासूचे’ मालिकेमध्ये एकत्र आलो आणि त्यात मी श्वेताचा नवराच होतो. त्या मालिकेत श्वेता खलनायिका होती आणि मी तिला मारणारा, त्रास देणारा अशी माझी भूमिका होती. पण मग श्वेताने ते मनावर घेतलंआणि तिने मला असं म्हटलं की, तू माझ्याबरोबर हे सगळं केलं आहेस तर मी आता तुझ्याशीच लग्न करणार आणि मग आमचं लग्न झालं”.

आणखी वाचा – Video : प्रशस्त हॉल, भव्य किचन अन् सुंदर देवघर, दिवाळीनिमित्त तितीक्षा तावडेने शेअर केली सासरच्या घराची खास झलक

यानंतर श्वेता यांनी त्यांच्या प्रपोजबद्दल सांगताना असं म्हटलं की, “मला मासे खायला आवडतात आणि खेकडे खाणे मला आवडते. आम्ही एकदा जुहूला एकेठिकाणी भेटलो होतो, तेव्हा त्याने मला खेकडा सोलून दिला आणि खेकड्यांची नांगी देत त्याने मला प्रपोज केलं. मग त्यावर मीदेखील त्याला तू यापुढेही अशीच खेकड्याची नांगी देणार असशील तर आपण लग करुयात असं म्हटलं. त्यानंतर आजही तो हे सगळं माझ्यासाठी करतो”. दरम्यान, श्वेताच्या नवऱ्याबद्दल बोलायचे झाले तर श्वेताचा नवरा हिंदीमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर २००७ साली दोघे विवाहबद्ध झाले. श्वेताचा पती संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

Tags: Sandeep Bhansalishweta shindeShweta Shinde and Sandeep Bhansali lovestory
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
siddharth aanand diwali party

सुहाना खान व अगस्त्य नंदामध्ये वाढती जवळीक? दिवाळी पार्टीत पोहोचलं कपल, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.