बॉलिवूड चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंद सध्या खूप चर्चेत आला आहे. नुकतेच त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले गेले. त्याच्या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये कतरिना कैफ, विकी कौशल, विकी कौशल, सुहाना खान, अगस्त्य नंदा, करण जौहर, शाहिद कपूर, मीरा राजपूत व श्वेता बच्चन असे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. पण कतरिनाच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. कतरिनासमोर बच्चन कुटुंबाची मुलगी श्वेता नंदाची जादू काही चालू शकली नाही. तसेच सुहानादेखील लूकच्या बाबतीत खूप कमी पडली. (siddharth aanand diwali party)
सिद्धार्थने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीसाठी कतरिनाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. तसेच त्यावर तिने मॅचिंग ब्लाऊजदेखील घातला होता. तसेच तिच्याबरोबर तिचा नवरा विकी कौशलदेखील काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आला. पार्टीमध्ये विकीबरोबर कतरिनाने एंट्री केली. तसेच अभिनेत्रीने हसून सगळ्यांना अभिवादन केले आणि दिवाळीच्या शुभेच्छादेखील दिल्या.
सुहानानेदेखील सुंदर अशी साडी नेसली होती. तसेच अगस्त्यने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. सुहाना व अगस्त्य यांना एकत्रित कारमध्ये पाहण्यात आले. तसेच एकमेकांशी बोलतानादेखील दिसले. शाहिद कपूरने काळ्या व सोनेरी रंगाचा पारंपरिक आऊटफिट परिधान केला होता. तसेच मीरानेदेखील सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये करण जोहरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. युयाने हिरव्या रंगाचे नक्षीकाम असणारा पांढरा आऊटफिट घातला होता.
अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा काहीशी वेगळ्या अंदाजात दिसून आली. श्वेताने हिरव्या व सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता. बिपाशा बासुने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. विकी यावेळी एका वेगळ्याच अवतारात दिसून आला. त्याच्या आता कामबद्दल बोलायचे झाले तर तो रणबीर कपूर व आलिया भट्टबरोबर ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसून येणार आहे. तसेच त्याचा ‘छावा’ चित्रपट ६ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.