आई-लेकाचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यापैकी एक आहे. आयुष्याच्या प्रत्येक जडणघडणीत आई आपल्या मुलाच्या नेहमीच पाठीशी राहते. तसाच मुलगादेखील आईच्या प्रत्येक क्षणाला तिच्या पाठीशी राहतो. याची प्रचिती दिसून आली ती, अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि तिच्या मुलाच्या बाबतीत. मालिका व नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळाच ठसा उमटवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार विनोदी व्यक्तिरेखांसह खलनायिकेच्या व्यक्तिरेखेमध्येही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण, पडद्यावर आईची भूमिका साकारणारी विशाखा खऱ्या आयुष्यात मात्र एकदम वेगळी आहे. (Vishakha Subhedar talks about her Honeymoon)
अभिनेत्री विशाखा सुभेदारला अभिनय नावाचा मुलगा असून या माय-लेकाचं नातं अतिशय घट्ट आहे. शिवाय हे दोघे घरात अगदी मित्राप्रमाणे वागत असून घरातील वातावरण अगदी वेगळं असल्याचे तिने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात विशाखाने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
विशाखाचे वयाच्या २१व्या वर्षी लग्न झाले असून तिने आपल्या हनीमूनच्या वेळेस आपल्या अंतिम वर्षातील परीक्षेचा निकाल लागला असल्याचेही सांगितलं आहे. विशाखाने तिच्या हनिमूनच्या वेळी घडलेला किस्सा सांगताना तिचे आणि तिच्या मुलाचे नाते कसे आहे, याचा खुलासा केला आहे.
हे देखील वाचा – “मला फटकारलं, टोमणे मारले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यावरुन विशाखा सुभेदारचं भाष्य, म्हणाली, “कोणी मला जज करावं हे…”
विशाखा सुभेदार म्हणाली, “आपण इतके बालिश असतो ना, हे पन्नास-चाळीशीत आल्यावर कळतं. मी २१ वर्षाची होते, तेव्हा मी हनिमूनला होते. त्यावेळेस माझ्या अंतिम वर्षाचा निकाल लागला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं, की आपलं खूप लवकर लग्न झालं आहे. पण ते चांगलं झालं. त्यामुळे माझं आयुष्य सुरळीत मार्गी लागलं. मी आता ४६ वर्षाची आहे, माझा मुलगा २३ वर्षाचा आहे, त्यामुळे ते व्यवस्थित आहे. आमच्या दोघांमध्ये फार कमी जनरेशन गॅप असल्यामुळे आम्हा दोघांचं नातं खूप छान आहे, एक मैत्रीसारखं.”
हे देखील वाचा – विशाखा सुभेदारच्या लग्नासाठी आई वडिलांचा होता नकार, खुलासा करत म्हणाली, “एका अटीवर त्यांनी…”
“माझा मुलगा मला आई पण समजतो, एक मैत्रीण म्हणून समजतो. तो काही गोष्टी लपून सांगतो, काही हक्काने सांगतो. आमच्यात भांडणं पण होतात. पण खूप छान नातं आहे माझं माझ्या लेकाबरोबर. त्यामुळे खूप बरं वाटतं की, माझं लवकर लग्न होऊन मला मुल-बाळ झाली. त्यामुळे मला तो लहान वगैरे असल्याचं कधीच वाटत नाही. घरात आम्हा दोघांचं मस्त वातावरण असतं.”, असं ती तिच्या मुलाबद्दल बोलताना म्हणाली आहे.