मराठी टेलिव्हिजवरीलवरील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर व हार्दिक जोशी हे सतत चर्चेत असतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणा दादा व अंजली पाठक यांच्या भूमिकेतून ही जोडी पाहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या फ्रेश जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेमही मिळाले. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली होती. नंतर दोघांच्याही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. अक्षया व हार्दिक हे दोघेही सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी सप्तशृंगीचे दर्शन घेतले असून अक्षयाने देवदर्शनाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (akshya deodhar and hardeek joshi instagram)
लग्नाला दीड वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा अक्षया व हार्दिक सप्तशृंगी दर्शनासाठी पोहोचले आहेत. दोघेही यावेळी खूप छान दिसत होते. कुटुंबासमवेत दोघेही दर्शन घेताना दिसले. यावेळी अक्षयाने पिवळ्या रंगाची साडी नसेली होती तर हार्दिकने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. अक्षयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांच्याही कपाळाला टिळा लावलेला दिसत आहे. अक्षयाच्या साध्या पण युनिक मंगळसूत्राकडेही सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लग्नानंतर हार्दिक झी मराठी वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसला. या कार्यक्रमातील त्याच्या रांगड्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा लूक सगळ्यांना आवडला होता. तसेच त्याने केलेल्या सूत्रसंचालनाचेही कौतुक केले होते.
अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आतापर्यंत ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली होती. तसेच तिने ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. हा एक कॉमेडी शो होता. परंतु लग्नानंतर ती अभिनयापासून दूर असलेली दिसून येत आहे. पण सोशल मीडियावर ती सक्रिय असून ती सतत चाहत्यांशी संवाद साधत असते. लवकरच अक्षयाने अभिनय सुरु करावा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.