रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हाच खरा कोकणी माणूस”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा कोकणातल्या गावी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास, घरही अगदी साधं, चाहते म्हणाले, “इतका साधेपणा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 29, 2024 | 3:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nikhil Bane Konkan Tour

"हाच खरा कोकणी माणूस", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा कोकणातल्या गावी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास, घरही अगदी साधं, चाहते म्हणाले, "इतका साधेपणा..."

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर या कार्यक्रमातील कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कलाकारांना या कार्यक्रमातील विनोदी अंगामुळे पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमातून ‘भांडुपचा शशी कपूर’ अशी आपली वेगळी ओळख मिळवत अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला विनोदी अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिलचा या कार्यक्रमामुळे खूप मोठा चाहतावर्ग झाला आहे. आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निखिल सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. (Nikhil Bane Konkan Tour)

सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व त्याच्या कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. अशातच निखिलने कोकण दौऱ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. निखिल हा बरेचदा सण, उत्सव साजरे करायला गावी जात असतो. निखिल हा कोकणातला असून चिपळूण हे त्याचं गाव आहे. अधूनमधून तो त्याच्या गावच्या घरी जात असतो. अशातच निखिलने गावी प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – अधिपतीने गाणं शिकण्याची अक्षराची इच्छा, भूवनेश्वरी मात्र संपूर्ण डाव मोडणार, सासू-सूनांमध्ये पुन्हा नवा वाद

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

ऐन उन्हाळ्यात कोकणात तुडुंब भरून जाणाऱ्या ट्रेनने चक्क निखिलने प्रवास केला आहे. आलिशान व या खासगी गाडीचा वापर न करता निखिल थेट मेल एक्सप्रेसने गावी पोहोचला आहे. निखिलने चक्क दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेनने प्रवास करत चिपळूण गाठलं आहे. चिपळूणवरून गावी जाण्यासाठी त्याने एसटी बस म्हणजे कोकणच्या लालपरीने प्रवास केला. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या गावच्या घराची झलक व कोकणातल्या निसर्गाची झलक दाखविली आहे. निखिलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्या साधेपणाचे कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – राजकारणावर कविता केल्यानंतर राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेला घरी बोलावलं अन्…; म्हणाला, “भीतीपोटी अडीच तास शिवाजी पार्कात फिरलो आणि… “

“खरा कोकणी माणूस,जमिनीवर पाय असलेला आमचा चिपळूणकर हिरो”, “आयला हा तर आपल्यातलाच आहे. भावा खूप मोठा हो. कोकण रेल्वेने नाही तर मुंबई गोवा महामार्गावर तुझी मर्सिडीज बीएमडब्लू धावली पाहिजे ज्यात तू बसलेला पाहिजे”, “बने मित्रा, तुम्ही एवढे साधंपणाने राहणारे असाल, असं खरंच वाटलं नव्हतं. आमचे संपूर्ण कुटुंब तुम्हां सर्वांचे खूप मोठे चाहते आहोत, हा साधेपणा असाच टिकवून ठेवा, परमेश्वर भरपूर प्रगती देवो तुम्हांला”, “तू एक असा कलाकार आहेस जो सामान्य जीवन जगतो आहेस आणि हेच खरे जीवन आहे. तुला कसला गर्व नाही. भांडुप स्टेशन ते टेंबी पाडा तू शेअर रिक्षाने जातो आणि ही गावी दिवा पॅसेंजर ट्रेनने जातोस भारी वाटले”, असं म्हणत त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे.

Tags: entertainmentkonkan tourmarathi actornikhil baneNikhil Bane Konkan Tour
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo audience expressed their displeasure see the details

"उगाच मालिका वाढवत आहेत", 'सातव्या मुलीची…'मधील विरोचक व देवीआईच्या कथेमधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "फक्त मुर्खपणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.