मराठी कलाविश्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर. ऐश्वर्या व अविनाश हे गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आजवर या नारकर कपलने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या जोडप्याची एनर्जी एखाद्या तरुणाईला लाजवेल अशी आहे. कलाकार म्हणून गेला अनेक काळ ही जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.त्यांच्या कामासोबतच ही जोडी सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. (Aishwarya Narkar Angry On Netizen)
नारकर कपलचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रील सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. आता दोघेही वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसतात. पण मालिकांच्या व्यस्त शेड्यूलमधून दोघेही वेळात वेळ काढून रीलदेखील बनवतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या नवऱ्याबरोबर केलेल्या डान्स व्हिडीओनंतर एका नेटकऱ्याने त्यांना इन्स्टाग्राम अकाउंटवर मॅसेज करत ट्रोल केलं आहे. मात्र नेटकऱ्याला या मॅसेजनंतर त्यांनी सरळ उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेटकऱ्याबरोबरचा संवाद पोस्ट केला आहे. यांत त्याने मॅसेज करत असं म्हटलं हे की, “तुम्ही इतके हॉट डान्स करता आणि तुमचा नवरा तुमचा व्हिडीओ व परफॉर्मन्स खराब करतो”, असा मॅसेज केला आहे. यावर ऐश्वर्या नारकरांनी त्या नेटकाऱ्याला चांगलीच अद्दल शिकवलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी. त्यांच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट काढत नेटकऱ्याच्या वडिलांच्या नावावरुन कॅप्शन देत जाब विचारला आहे. “बाबुलाल संस्कार केले नाहीत का?”, असा थेट सवाल विचारात त्या नेटकऱ्याला टॅग केलं आहे.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये नेटकऱ्याचा संवाद पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या यांनी टॅग करत स्टोरी पोस्ट करताच, त्या नेटकऱ्याने मॅसेज करत असं म्हटलं की, “मॅडम मला ब्लॉक करा. तुम्हाला हे शोभत नाही, तुमचं काय करायचं. हॉट बोलत होतो तेव्हा तुम्हाला मस्त वाटत होतं”, असं म्हटलं.