बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन, त्यानंतर लग्न आणि…; आयुष्याच्या त्या निर्णयाबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aditi Sarangdhar On Live-in Relation

दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन, त्यानंतर लग्न आणि…; आयुष्याच्या त्या निर्णयाबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली…

मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधर हिने आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कधी खलनायिकेच्या भूमिकेत तर कधी सोज्वळ भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. अदिती नेहमीच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. बऱ्याच न पटणाऱ्या मुद्द्यांवर ती स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. वैयक्तिक आयुष्याविषयीदेखील अदिती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. सध्या अदिती तिच्या आगामी ‘बाई गं’ या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. (Aditi Sarangdhar On Live-in Relation)

कायमच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करत चर्चेत असणाऱ्या अदितीने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अदितीने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सध्या चर्चेत असणाऱ्या लिव्ह-इन रिलेशनबाबत तिचं मत काय आहे असा प्रश्न तिला विचारला होता. यावेळी उत्तर देत तिने स्वतःदेखील लिव्ह-इनमध्ये राहिली असल्याचा खुलासा केला. आणि ही प्रथा जुनी आहे असं देखील वक्तव्य केलं.

आणखी वाचा – “खरी गुड न्यूज…” कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चांवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, “सगळ्यात आधी…”

याचं उत्तर देत अदिती म्हणाली, “सोशल मीडिया आलं त्यामुळे या चर्चा अधिक वाढल्या. पण हा ट्रेंड काही नवीन नाही. सुहास आणि मी दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. पूर्वीच्या काळात काही लोकांनी बायका ठेवलेल्या असायच्या पण ती काही नवीन पद्धत नाही. अशा रिलेशनशिपमध्ये राहणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि तशी त्यांची चॉईस आहे. लग्न ही संस्कृती प्रत्येकाने जापायला पाहिजे. जर लग्नासारखी कमिटमेंट तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहू शकता”.

आणखी वाचा – Video : वडिलांचा ८४वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्…; क्रांती रेडकरच्या आई-वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

पुढे ती म्हणाली, “आजकाल बऱ्याचश्या मुली या करिअरकडे झुकल्या आहेत त्यामुळे ३५,४०शीत त्या आयुष्याच्या या स्थितीचा विचार करतात. आणि मुलं होऊ न देणे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मुलं होणं ही केवळ जबाबदारी नाही तर एक आर्थिक तडजोड आहे”.

Tags: aditi sarangdharAditi Sarangdhar On Live-in Relationentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Shiv Thakare, Vishal Nikam, Gayatri Datar, Kiran Mane and Utkarsha Shinde expressed happiness on the new promo of Bigg Boss Marathi 5

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वासाठी चाहत्यांसह जुने स्पर्धकही उत्सुक, रितेश देशमुखचा ‘लय भारी’ स्वॅग पाहून म्हणाले, “खरा चेहरा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.