रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वडिलांचा ८४वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्…; क्रांती रेडकरच्या आई-वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 15, 2024 | 5:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar shared a special video on social media of celebrating his father's 84th birthday

Video : वडिलांचा ८४वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्...; क्रांती रेडकरच्या आई-वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत कायमच सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक मराठी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर.  क्रांती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडिओही पोस्ट करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडिओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच क्रांतीने नुकताच आणखीन एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.

क्रांतीने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे तिने वडिलांच्या वाढदिवसाची खास झलक दाखवली आहे. यामध्ये क्रांतीचे वडील तिच्या आई व मुलीसह केक कापतानाचे पाहायला मिळत आहे. तसेच क्रांतीची आई व वडिलांमधील खास प्रेमदेखील या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. त्यांच्यातील या खास प्रेमाबद्दल क्रांतीसह तिच्या अनेक चाहत्यांनी कौतुक केलं आहे. क्रांतीने तिच्या आई-वडिलांबद्दलच्या या भावना खास शब्दांत व्यक्त केल्या आहेत. क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आई-वडिलांचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – ईशा अंबानीचा गरोदरपणाबाबत मोठा खुलासा, आईप्रमाणेच IVFद्वारे दिला मुलांना जन्म, म्हणाली, “अजिबात सोपं नाही आणि…”

या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये क्रांतीने असं म्हटलं आहे की, “आम्ही माझ्या वडिलांचा ८४वा वाढदिवस साजरा केला अंमई यावेळी ते त्यांच्या ‘लाइफलाइन’ म्हणजेच त्यांच्या पत्नीबरोबर होते. खरं तर ते एकमेकांना पूर्णत्व देतात आणि यालाच मी खऱ्या अर्थाने ‘लग्न’ म्हणते. जगात जिथे लोक एकमेकांचा सहज त्याग करतात तिथे हे दोघे एकममेकांबरोबर कायम आहेत. “मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे” असे आपण म्हणतो त्याचे ते एक परिपूर्ण उदाहरण आहेत. जेव्हा मी माझे आशीर्वाद मोजते, तेव्हा मी दररोज देवाचे आभार मानते की, ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. माझे पालक या नात्याने हे दोन अतिशय अद्भुत लोक मिळाल्याबद्दल मी देवाची कायम कृतज्ञ आहे”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता शूटिंगसाठी पोहोचला कोकणात, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला…

दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनीही तिच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओखाली चाहत्यांनी “आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील चेहऱ्यावरील हास्य पाहणे हे सुख आहे”, “असाच गोडवा कायम राहू देत ही प्रार्थना”, “वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा”, “ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.   

Tags: kranti redkarKranti Redkar Father Birthdaymarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
vicky kaushal on katrina kaif pregnancy

 “खरी गुड न्यूज...” कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चांवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, “सगळ्यात आधी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.