शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

 “खरी गुड न्यूज…” कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चांवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, “सगळ्यात आधी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 29, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vicky kaushal on katrina kaif pregnancy

 “खरी गुड न्यूज...” कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चांवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, “सगळ्यात आधी...”

बॉलीवुड अभिनेता विकी कौशल हा नेहमी चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचेदेखील मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो त्याच्या खासगी आयुष्यातदेखील नेहमी चर्चेत असतो. नुकताच त्याच्या एका चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बॅड न्यूज’ असे चित्रपटाचे नाव असून यामध्ये त्याच्या बरोबर तृप्ती डीमरी व ॲमी विर्क हेदेखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावरुन तो चर्चेत आला आहे. (vicky kaushal on katrina kaif pregnancy)

विकी सध्या रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या नवीन चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. ट्रेलर लॉचच्या दरम्यान पापाराझीनी विकीला पत्नी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न विचारले. त्यावर विकीने जे उत्तर दिले तेव्हा सगळे जण आश्चर्यचकित झाले. विकी व कतरिनाच्या लग्नाला तीन वर्ष झाली. लग्नानंतर अनेकदा कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा – “पायलने एखाद्या पुरुषाला घरी आणलं तर ?”, पत्नीबाबत प्रश्न विचारताच अरमान मलिक भडकला, म्हणाला, “तिने असं केलं तर…”

View this post on Instagram

A post shared by VickyKatrina16 ???? (@vickykatrina16)

प्रमोशनदरम्यान विकीला विचारले की, “खरी गुड न्यूज कधी देणार?”, त्यावर विकीने हसून सांगितले की, “जेव्हा खरी गुड न्यूज असेल तेव्हा मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन. सध्या तुम्ही ‘बॅड न्यूज’ एंजॉय करा. पण जेव्हा ती बातमी असेल तर मी नक्कीच सगळ्यांना सांगेन”. ‘बॅड न्यूज’ ट्रेलर लॉचच्या दरम्यान चित्रपटातील सर्वांनीच चित्रपटाला हजेरी लावली होती. चित्रपटाचा विषयदेखील याच संदर्भात असल्याने विकीला प्रश्न विचारला गेला. विकीनेदेखील या प्रश्नाचे शांतपणे आणि मजेशीर उत्तर दिले. त्याच्या उत्तराने सगळेच जण हसू लागले.

आणखी वाचा – हिना खानला स्तनाचा कर्करोग, सर्वत्र काळजीचं वातावरण, कलाकारांकडूनही पाठिंबा

दरम्यान विकीचा हा चित्रपट ‘धर्मा प्रोडक्शन’च्या अंतर्गत तयार केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळ्यांमध्येच या चित्रपटाबद्दल उत्सुकता दिसून आली आहे.

Tags: katrina kaifPregnancy Newsvicky kaushal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Aditi Sarangdhar On Live-in Relation

दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन, त्यानंतर लग्न आणि…; आयुष्याच्या त्या निर्णयाबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.