शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाई नाचताना बघायला आवडते पण…”, हिंदवी पाटीलचा उल्लेख करत मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “या मुलीची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aarti Solanki Post

"बाई नाचताना बघायला आवडते पण…", हिंदवी पाटीलचा उल्लेख करत मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "या मुलीची…"

Aarti Solanki Post : हिंदवी पाटील ही आपल्या दिलखेच अदाकारी आणि जबरदस्त नृत्याच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्राला भूरळ घालणारी प्रसिद्ध नृत्यांगणा म्हणून ओळखली जाते. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या हिंदवीने तिच्या नृत्याने साऱ्यांना वेड करुन सोडलं. कायमच आनंदात आपल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हिंदवीच्या डोळ्यांत आज अश्रू आहेत. कारण पुण्यातील अतिक्रमण विभागाच्या कारवाईमध्ये हिंदवी पाटीलच्या दुकानावर हातोडा चालवण्यात आला आहे. याबाबत तिला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचंही हिंदवीने स्पष्ट केलं. हिंदवी पाटील हिचं पुण्यामध्ये सह्याद्री अमृततुल्य नावाचं शॉप आहे. तिनं कष्टानं ते दुकान उभारलंय.

हिंदवीच्या याच शॉपवर अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये हिंदवीच्या शॉपच्या बोर्डचं तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचही मोठं नुकसान झालं. या कारवाईनंतर हिंदवीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदवी बरोबर घडलेल्या या घटनेवर आता मराठमोळी अभिनेत्री आरती सोळंकी हिने भाष्य केलं आहे. थेट हिंदवीचा फोटो शेअर करत तिने या प्रकरणावर आपले स्पष्ट मत मांडले आहे. आरती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. न पटलेल्या मुद्द्यांवर ती स्पष्टपणे भाष्यही करते. आता हिंदवीच्या दुकानाचं नुकसान झाल्यानंतर अभिनेत्रीने यावर आपलं मत मांडलं आहे.

आणखी वाचा – १७ वर्षांनी जेठालाल व बबिता जींची ‘तारक मेहता…’मधून एक्झिट?, नुकत्याच झालेल्या भागात दिसले नाहीत, अय्यरचा प्रवासही संपला…

View this post on Instagram

A post shared by Aartii Sharu Solankii (@aartiisolankii135)

आरतीने पोस्ट शेअर करत, “कुठे गेले ते मिलियन फॉलोअर्स आणि नेतेमंडळी जे यांचे शोज ठेवतात. बाई नाचताना बघायला आवडते पण, कष्ट करुन पोट भरताना नाही. माझ्यासारखे लोक या मुलींना नावं ठेवतात की, यांच्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. सत्य हे आहे की त्यांना नाचवणाऱ्यांनी बिहार केला आहे. मी या मुलीची बाजू घेत नाही आहे पण, कुठल्याही स्त्रीला अशाप्रकारे नाच करायला आवडणार नाही. ती फक्त पोट भरण्यासाठी, स्वतःचं घर चालवण्यासाठी हे करतेय. आज या हिंदवी पाटीलच्या शोवर बंदी नाही आहे पण, तिच्या दुकानावर कारवाई केली जात आहे”.

आणखी वाचा – प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ‘मुंबई लोकल’मधून सुरु होणार आहे प्रथमेश-ज्ञानदाचा रोमँटिक प्रवास, चित्रपटाचे पोस्टर समोर

शेवटी आरती असं म्हणाली आहे की, “खरंतर, जे लोक यांचे शोज ठेवतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गरीबाने कष्ट करु नये, फालतूगिरी केली तर चालेल. आज जर ती कष्ट करुन पोट भरु पाहतेय तर तिला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे”. आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत हिंदवीला पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: aarti solankientertainmenthindavi patil
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Vaibhav Mangle In Hindi Language Compilation

"मुंबईत मराठीची वाट लागली", हिंदी सक्तीनंतर मराठमोळा अभिनेत्याचा रोष, स्पष्टच म्हणाला, "भिकारणीची अवस्था…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.