मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुंबईत मराठीची वाट लागली”, हिंदी सक्तीनंतर मराठमोळा अभिनेत्याचा रोष, स्पष्टच म्हणाला, “भिकारणीची अवस्था…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2025 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vaibhav Mangle In Hindi Language Compilation

"मुंबईत मराठीची वाट लागली", हिंदी सक्तीनंतर मराठमोळा अभिनेत्याचा रोष, स्पष्टच म्हणाला, "भिकारणीची अवस्था…"

Vaibhav Mangle In Hindi Language Compilation : हिंदी सक्तीचा वाद राज्यात पेटून आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होताच या वादाने उडी घेतली आहे. नवीन जीआरनुसार हिंदी सक्तीची नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गे हा वाद काही संपत नाही आहे. एकूणच याला राज्यभरातून विरोध दर्शविण्यात येत आहे. इतकंच नाही तर अनेक कलाकार मंडळींनीही या प्रकरणावर आवाज करत विरोध केला आहे. अशातच मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते वैभव मांगले यांनी हिंदी सक्तीवर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी थेट पोस्ट शेअर केली आहे.

वैभव यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत, “उर्वरीत महाराष्ट्रचं मला माहीत नाही पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागतं हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगल मराठी बोलायचं विसरुन गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची ( मुळात आई मराठी बोलत असले तर ) भिकारणीची अवस्था होईल. आता तर खेडोपाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत. मुंबई-पुणे येथे अनेक शाळामध्ये मराठी शिकवीत नाहीत”.

आणखी वाचा – “बाई नाचताना बघायला आवडते पण…”, हिंदवी पाटीलचा उल्लेख करत मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “या मुलीची…”

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई- बाबांना धड इंग्रजी येत नाही. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते (शिक्षक तरी किती चांगलं बोलतील) त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही. त्यात बोली भाषा वेगवेगळ्या , पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका. त्याचा वेगळा ताप. आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात. मी उबारलायस म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. ‘माझ्या वांगडा चल’ म्हणतो तर शाळेत माझ्या बरोबर चल म्हणा म्हणतात”.

आणखी वाचा – एबीसीडी नाही तर थेट सारेगमप…; अर्जुनच्या लेकावरील संस्कारांचं कौतुक, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दाखविली झलक

शेवटी वैभव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ही त्या बालमनाला संकट वाटतात. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला )जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा. आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे .तिच्या बद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर सिरियलला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत (अनेक ठिकाणी ) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत. हिंदी पहिली पासून येईल न येईल हा माझ्यासाठीचा नंतरचा मुद्दा आहे, येणार ही नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का?. आपण आपल्या मुलांच मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का?. मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का ?”. वैभव यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा देत हिंदी भाषा सक्तीला विरोध केला आहे.

Tags: Hindi Language Compilationtrending newsvaibhav mangle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Actress Shefali Jariwala Passed Away

'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.