सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काम मिळत नसताना वडिलांची साथ, आता तेच नाही म्हणत रडू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 11, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aamit bhanushali talk about father

काम मिळत नसताना वडिलांची साथ, आता तेच नाही म्हणत रडू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ

कणखर बोलणं, कठोर स्वभाव, शिस्त म्हणजे शिस्त… तरीही वेळ आली की, डोळ्यांतील अश्रू लपवत लेकरांसाठी जगातलं सगळं सुख पायी आणून ठेवण्याची ताकद ठेवतो तो बाप असतो. तुमच्याही आयुष्यात असाच एक बापमाणूस असणार हे नक्की. बाबा कळायला थोडा कठीण पण एकदा कळाला की, तो कसं बरं सगळं करत असेल? असे हजारो, लाखो प्रश्न मनात उपस्थित होतात. मात्र त्याच बापाचं जेव्हा छत्र हरपतं तेव्हा खरी किंमत कळते. याचा अनुभव ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने खऱ्या आयुष्यात घेतला आहे. अमित आज इथवर त्याच्या वडिलांमुळेच पोहोचला. याबाबत त्याने पहिल्यांदाच अगदी उडपणे भाष्य केलं. (Aamit bhanushali talk about father)

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात अमितने हजेरी लावली होती. यावेळी बरीच धमाल-मस्ती झाली. पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, निक्की तांबोळी, शिवानी सुर्वे, प्रियांका तेंडुकर असे अनेक कलाकारांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अमितने त्याच्या बाबांबद्दल बोलताना सगळ्यांनाच रडवलं. बाबांविषयी बोलताना तो ढसाढसा रडू लागला. तसेच स्ट्रगलच्या दिवसांमध्ये वडिलांनी कशाप्रकारे साथ दिली? याविषयी त्याने सांगितलं.

आणखी वाचा – “खूप वर्षांनी बाबा होतोय, चिंता आहे पण…”, पहिल्यांदाच दुसऱ्या बायकोच्या प्रेग्नंसीबाबत बोलला अरबाज खान, ५७व्या वर्षी बाबा होणार

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अमित म्हणाला, “ऑडिशन देत देत दिड वर्ष फिरलो. कधीच काम मिळालं नाही. जेव्हा हरलो तेव्हा जॉब हातात घेतला. जॉईनिंग लेटर बाबांच्या हातात दिलं. तेव्हा तो एकमेव व्यक्ती होता त्याने माझं जॉइनिंग लेटर फाडलं. मला म्हणाले तू जा बाप अजूनही आहे. तुझं स्वप्न पूर्ण कर. थोडंफार यश मिळालं. पण आज हेच सगळं जगायला ते नाहीत”. अमितने एवढं सांगितलं आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.

आणखी वाचा – वर्षभरापूर्वीच वडिलांचे कर्करोगाने निधन अन् आता अभिनेत्रीलाही ब्रेस्ट कॅन्सर, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा कठीण काळ, लेकही राहते दूर…

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

अमितचं बोलणं ऐकताना सहकलाकारांनाही अश्रू अनावर झाले. सेटवरील प्रत्येक व्यक्ती अगदी ढसाढसा रडला. अमित सहकलाकारांना मिठी मारुन रडला. अमितचे बाबा आता त्यांच्याबरोबर नाहीत. पण वेळोवेळी त्याला वडिलांची कमी नक्कीच जाणवते. अमितचं बोलणं ऐकल्यानंतर त्याचं त्याच्या वडिलांवर किती प्रेम आहे हे दिसून आलं. तसेच स्ट्रगलच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले वडील अमितच्या पाठीशी आयुष्यभर उभे आहेत हे नक्की.

Tags: entertainment newsmarathi actormarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Dipika Kakar Instagram Story

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची पहिली पोस्ट, अभिनेत्रीची तब्येत आता नेमकी कशी?, म्हणाली, "अल्लाह…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.