सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची पहिली पोस्ट, अभिनेत्रीची तब्येत आता नेमकी कशी?, म्हणाली, “अल्लाह…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2025 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dipika Kakar Instagram Story

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची पहिली पोस्ट, अभिनेत्रीची तब्येत आता नेमकी कशी?, म्हणाली, "अल्लाह…"

Dipika Kakar Instagram Story : टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या आजारपणाशी लढा देत आहे. अलीकडेच अभिनेत्रीवर स्टेज २ यकृत कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली आहे. दीपिकाची शस्त्रक्रिया तब्बल १४ तास सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर ती आता सावरत आहे. अलीकडेच, शोएब इब्राहिमने एक ब्लॉग शेअर केला ज्यामध्ये त्याने शस्त्रक्रियेनंतर दीपिकाची झलक दर्शविली. ज्यामध्ये तिच्या हाताला पट्टी लावलेली दिसली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आता दीपिकाने शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दीपिका कक्करने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक सकारात्मक कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने अल्लाहबद्दल लिहिले आहे. दीपिकाने लिहिले, “अल्लाह पहात आहे, अल्लाहला माहित आहे आणि अल्लाह सर्व काही ठीक करेल”. याचशा तिने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहेत. दीपिकाला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. इतकंच नाही तर चाहत्यांमध्येही काळजीच वातावरण पाहायला मिळालं. मात्र, दीपिकाच्या पाठीशी तिचे कुटुंब आणि चाहत्यांचे प्रेम होते.

आणखी वाचा – ‘बालिका वधू’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केले रोमँटिक फोटो, शुभेच्छांचा वर्षाव “

शोएबने तिच्या व्हीलॉगमध्ये सांगितले होते, दीपिकाची १४ तासांची शस्त्रक्रिया होती आणि ती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. तिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगत त्याने त्यानंतर दीपिकाची ओळख करुन दिली. त्यावेळी दीपिका अचानक रडण्यास सुरुवात करते. आणि ती म्हणते, “सांगण्यासारखे काही नाही. मी शस्त्रक्रियेनंतर अधिक भावनिक झाले आहे. मला छोट्या छोट्या गोष्टींवर रडू येत आहे”.

आणखी वाचा – काम मिळत नसताना वडिलांची साथ, आता तेच नाही म्हणत रडू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ

नंतर व्हिडीओमध्ये ती दाखवते की, शोएब आणि दीपिकाची आई तिला भेटायला आली आहे. मुलगा रुहान देखील त्याच्याबरोबर येतो. दीपिका रुहानला पाहून खूप खुश होते आणि आपल्या मुलाबरोबर खेळू लागते. आईला पाहून, रुहानसुद्धा खूप आनंदी होतो आणि तिच्याशी बोलतो. हावभावांमध्ये बर्‍याच गोष्टी तो तिला सांगताना दिसतोय. रुहानला पाहून दीपिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. जेव्हा चाहत्यांना दीपिकाच्या कर्करोगाबद्दल कळले तेव्हा त्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्हिडीओमध्ये शोएब चाहत्यांना दीपिकासाठी प्रार्थना करण्यास सांगत असे.

Tags: dipika kakarentertainemnt newstelevidion actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Shubhangi Atre Gets Emotional

"घटस्फोट घेतला आणि दोन महिन्यात तो गेला", 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री नवऱ्याच्या आठवणीत भावुक, म्हणाली, "नशेच्या आहारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.