शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा प्राजक्ता माळीला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “काही वाचाळवीरांमुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2024 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Sushant Shelar support to actress Prajakta Mali by sharing a special post

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा अभिनेत्री प्राजक्ता माळीला पाठिंबा, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

मालिका, चित्रपट व सीरिज या माध्यमांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, निवेदक, व्यावसायिका आणि निर्मातीही आहे. अनेक क्षेत्रात वावर असलेली ही बहुगुण संपन्न अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळींसह काही अभिनेत्रींची नावं घेतली. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे.  प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण खूप चिघळलं असून या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. (Sushant Shelar support to Prajakta Mali)

प्राजक्ताने या संपूर्ण प्रकरणी सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. तसंच काल (शनिवार) प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडलं. यावर आता मराठी कलाविश्वतून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक-लेखक सचिन गोस्वामी, निर्माते नितीन वैद्य, अभिनेत्री मुग्धा गोडबोले व नृत्यांगना गौतमी पाटीलने प्राजक्ताला पाठींबा दिला आहे. त्यानंतर आता मराठी अभिनेता सुशांत शेलारनेही अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

आणखी वाचा – “फक्त नेत्याबरोबरच नाही तर…”, प्राजक्ता माळीबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, “एका कलाकाराचं दु:ख…”

सुशांतने सोशल मीडियावर प्राजक्ताचा फोटो शेअर करत तिच्यबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीराकडून ‘महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी’ यांच्याबद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”.

आणखी वाचा – “ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “अशा काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झाले आहे. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. मी एक कलाकार म्हणून प्राजक्ता माळी यांच्यासोबत आहे”. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, वस्तुस्थिती मांडून कठोर कारवाई मागणी करणार असल्याची माहिती प्राजक्ताने २८ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच कोणत्याही पुराव्याशिवाय ज्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत, त्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला.

Tags: prajakta malisushant shelarSushant Shelar support to Prajakta Mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
American actress and model dayle haddon died at the age of 76 due to carbon monoxide poisoning

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, बेडरुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं असं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.