भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह काहींच्या नावांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. प्राजक्ता माळीने काल (शनिवारी) पत्रकार परिषद घेत तिचं या राजकीय घडामोडींवर आणि नाव घेण्याबाबत मत मांडलं. त्याचबरोबर सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत तिने संतापही व्यक्त केला. यावर आता कलाविश्वाटून प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने या प्रकरणी प्राजक्ताला पाठींबा दिला आहे. (Gautami Patil supported to Prajakta Mali)
एबीपी माझाशी बोलताना गौतमी असं म्हणाली की, “सगळ्यात आधी मी प्राजक्ता ताईला सांगते की, ताई तु ट्रोल आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही सर्व कलाकार तुझ्याबरोबर आहोत. तुला ट्रोल जरी केलं तरी तु या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. आज तु जे काही बोललीस ते मी ऐकलं आणि तु जे काही म्हणालीस ते सगळं काही बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार मंडळी तुझ्याबरोबर आहोत. मी सुद्धा एक कलाकार आहे. तर मला म्हणायचं आहे की, कृपया एका कलाकाराला कलाकाराच्या जागी राहुद्या. फक्त नेत्याबरोबरच नाही तर कोणत्याही व्यक्तीबरोबर त्याचं नाव जोडू नका. कारण एका कलाकाराचं दु:ख हे एका कलाकारालाच माहीत असतं”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! लग्नपत्रिकेचा पहिला फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्याला अश्रु अनावर
यापुढे गौतमीने असं म्हटलं की, “आज कुणाला काय त्रास होत आहे हे तुम्हाला माहीत नाही. तो त्रास त्या व्यक्तीलाच माहीत. आज मला इतकं ट्रोल केलं गेलं. बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाले. पण माझा त्रास मला माहीत आहे. तो त्रास लोकांना माहीत नाही. लोक आपापल्या घरी राहतात. कृपया कुणाबरोबर कुणाचंच नाव जोडू नका, जे खूप चुकीचं आहे. उलट एका कलाकाराला तुम्ही पाठिंबा द्या. त्याच्याबरोबर उभे रहा. सगळेजण प्राजक्ता ताईवर प्रेम करतात. त्यामुळे ताई आम्हीसुद्धा तुझ्याबरोबर आहोत. तु याकडे लक्ष देऊ नकोस. अशीच पुढे जा, हसत रहा आणि खूप छान रहा”.
आणखी वाचा – “ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक, लेखक सचिन गोस्वामी यांनीदेखील या प्रकरणी खास पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजता जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडत आहे ते निषेधार्ह आहे. क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरुया”.