रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांचा विश्वास नाकारणारा मी कोण?”, आईच्या अंत्यसंस्कारावर सुप्रसिद्ध अभिनेता ट्रोल, चोख उत्तर देत म्हणाला, “साधी गोष्ट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 3, 2026 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prakash Raj mother death

"त्यांचा विश्वास नाकारणारा मी कोण?", आईच्या अंत्यसंस्कारावर सुप्रसिद्ध अभिनेता ट्रोल, चोख उत्तर देत म्हणाला, "साधी गोष्ट…"

Prakash Raj mother death : अभिनेता प्रकाश राज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची आई सुवर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले, त्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय दु:खी झाले आहेत. या कठीण काळात लोकांनी त्यांचे सांत्वन केले तर काही लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. विशेषत: त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराच्या संदर्भात वाद सुरु झाला, ज्यामुळे हा मुद्दा आणखी चर्चेत आला आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या श्रद्धेनुसार ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार बेंगळुरू येथे त्यांच्या आईचे अंतिम संस्कार केले. मात्र एका सोशल मीडिया यूजरने त्यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, “जो स्वत:ला नास्तिक म्हणवतो तो धार्मिक पद्धतीने अंतिम संस्कार कसा करु शकतो?”

यावर प्रकाश राज गप्प बसले नाहीत आणि त्यांनी थेट प्रत्युत्तर दिले की, “मी देवावर विश्वास ठेवत नाही, पण माझ्या आईने ठेवला आहे. त्यांचा विश्वास नाकारणारा मी कोण? त्यांना त्यांच्या श्रद्धेनुसार अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार आहे. द्वेष पसरवणाऱ्यांना इतकी साधी गोष्ट समजेल का?”. आईच्या निधनानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि आईची आठवण काढली आणि सांगितले की, “मला तिची खूप आठवण येईल”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाला, “पहिली कार…”

Yes. I don’t believe in god .. but my mother believed in her god . Who am i to deny her .. the right to be buried according to her belief. This is the basic respect we give one another. Will you Hate mongering monsters understand this #justasking https://t.co/vD1GhySf3M— Prakash Raj (@prakashraaj) April 2, 2026

गेल्या वर्षी प्रकाश राज यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा देवावर विश्वास नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी इतरांनाही असे करण्यास सांगावे. त्याची आई ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवत होती आणि त्याची पत्नी हिंदू धर्माला फॉलो करणारी आहे आणि तो दोघांच्याही श्रद्धेचा आदर करतो. तो आपल्या पत्नीसोबत पूजेला बसतो आणि आईसोबत चर्चला जायचा.

Tags: emotional newsprakash rajPrakash Raj mother death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi: तन्वीचं वचन तिच्या आजीने पूर्ण केलं, प्रभू शेळकेच्या कुटुंबाला दिली खास भेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.