बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्व. दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४’ पुरस्काराने सिद्धार्थ जाधव सन्मानित, भारावून गेला अभिनेता, म्हणाला, “जगाने म्हणावे…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 26, 2024 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Siddharth Jadhav honored with Dada Kondke Smriti Gaurav Samman 2024 award know more.

'स्व. दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४' पुरस्काराने सिद्धार्थ जाधव सन्मानित, भारावून गेला अभिनेता, म्हणाला, "जगाने म्हणावे..."

विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा अनेक प्रकारच्या भूमिकांमधून सर्वांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सिद्धार्थ हा त्याच्या अभिनयामुळे जितकाअ चर्चेत राहत असतो, तितकाच तो त्याच्या स्टायलिश अंदाजामुळेदेखील चर्चेत आहात असतो. याचे काही खास फोटो व व्हिडीओ तो सोशल मीडियाद्वारे शेअर करत  असतो. त्यामुळे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा सिद्धार्थ त्याच्या सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. अशातच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सर्वांचे लक्ष वेधून गहत आहे.

सिद्धार्थला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार व बक्षिसे मिळाली आहेत. अशातच या पुरस्कारांमध्ये आणखी भर पडली आहे. सिद्धार्थला ‘स्व. दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ पुरस्कार मिळाला आहे. याचनिमित्ताने त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमधून त्याने त्याच्या आनंदी भावना व्यक्त केली आहे. या व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “जगाने म्हणावे शाब्बास रे शाब्बास. ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, वाजवली आणि अभिनयाची दादागिरी केली. ते म्हणजे स्वर्गीय दादा कोंडके सर यांच्या नावाने दिला जाणारा “स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४ ” हा पुरस्कार अभिनय विभागासाठी मला देण्यात आला”.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरामध्ये खुललं प्रेम, परदेशात हनिमून करत आहेत एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर

यापुढे त्याने त्याच्या या पुरस्कारानिमित्त आभार मानत असं म्हटलं आहे की, “याबद्दल खूप भारी फिलिंग आहे. मी “मराठी सांस्कृतिक अभियान न्यास” यांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली आणि माझ्याबरोबर ज्या ज्या मान्यवर कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन”.

आणखी वाचा – “नाव, आडनाव सारखंच, अनेकदा सांगितलं पण…”, सोनाली कुलकर्णी आणि नावावरुन अभिनेत्रीचं मोठं भाष्य, म्हणाली, “फार त्रासदायक, वाईट…”

यापुढे सिद्धार्थने “तुम्हा सर्वांचा आशीर्वाद कायम असावा” असं म्हणत सर्व मराठी प्रेक्षकांचे व त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनी व मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही कमेंट्सद्वारे कौतूक केलं आहे.  

Tags: Jadhav Dada Kondke Smriti Gaurav Samman 2024marathi actormarathi entertainment newssiddharth jadhav
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
sai pallavi affair

दोन मुलं असलेल्या व्यक्तीला डेट करत आहे साई पल्लवी, वयानेही आहे खूपच मोठा, कोण आहे 'तो' अभिनेता?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.