विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा अनेक प्रकारच्या भूमिकांमधून सर्वांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सिद्धार्थ हा त्याच्या अभिनयामुळे जितकाअ चर्चेत राहत असतो, तितकाच तो त्याच्या स्टायलिश अंदाजामुळेदेखील चर्चेत आहात असतो. याचे काही खास फोटो व व्हिडीओ तो सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. त्यामुळे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा सिद्धार्थ त्याच्या सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. अशातच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सर्वांचे लक्ष वेधून गहत आहे.
सिद्धार्थला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार व बक्षिसे मिळाली आहेत. अशातच या पुरस्कारांमध्ये आणखी भर पडली आहे. सिद्धार्थला ‘स्व. दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ पुरस्कार मिळाला आहे. याचनिमित्ताने त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमधून त्याने त्याच्या आनंदी भावना व्यक्त केली आहे. या व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “जगाने म्हणावे शाब्बास रे शाब्बास. ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, वाजवली आणि अभिनयाची दादागिरी केली. ते म्हणजे स्वर्गीय दादा कोंडके सर यांच्या नावाने दिला जाणारा “स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४ ” हा पुरस्कार अभिनय विभागासाठी मला देण्यात आला”.
आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरामध्ये खुललं प्रेम, परदेशात हनिमून करत आहेत एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर
यापुढे त्याने त्याच्या या पुरस्कारानिमित्त आभार मानत असं म्हटलं आहे की, “याबद्दल खूप भारी फिलिंग आहे. मी “मराठी सांस्कृतिक अभियान न्यास” यांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली आणि माझ्याबरोबर ज्या ज्या मान्यवर कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन”.
यापुढे सिद्धार्थने “तुम्हा सर्वांचा आशीर्वाद कायम असावा” असं म्हणत सर्व मराठी प्रेक्षकांचे व त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनी व मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही कमेंट्सद्वारे कौतूक केलं आहे.