शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केदारनाथला सिद्धार्थ चांदेकरला आला होता दैवी अनुभव, सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाला, “मंदिरात जाऊन बसलो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2025 | 2:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Siddharth Chandekar narrated a story of his visit to Kedarnath and blessing of lord Shankar

सिद्धार्थ चांदेकरने सांगितला केदारनाथ दर्शनाचा अनोखा किस्सा, जाणून घ्या...

केदारनाथला जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. आयुष्यात एकदा तरी केदारनाथला जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र यासाठी योग जुळून येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अशीच एका अभिनेत्याची शूटिंगच्या निमित्ताने केदारनाथला जाण्याची आणि भगवान शंकरांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. नुकताच त्याचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि यानिमित्तने अभिनेता ठिकठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या केदारनाथच्या एका अनोख्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.  अजब गजबला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या केदारनाथमधील भगवान शंकरांच्या दर्शनाचा एक किस्सा सांगितला आहे. (Siddharth Chandekar Kedarnath story)

यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी शूटिंगसाठीच पाहिल्यांदा केदारनाथला गेलो होतो. खूप मोठी रांग होती आणि शूटिंगलाही वेळ कमी होता. मला आत जाऊन दर्शन घ्यायचं होतं आणि दिसत होतं की, खूप वेळ लागणार आहे. म्हणजे जवळपास तीन तास तरी लागले असते. त्यामुळे मी ठरवलं की, आत जात नाही, कारण पुन्हा खूप वेळ लागेल. पण तेव्हा काय माहीत नाही. मला तिथला एक गार्ड बोलवायला आला आणि तो बोलला की “तुम्हाला आत बोलावलं आहे”. तर मी म्हटलं की “कुणी बोलावलं आहे?”. तर तो पुन्हा फक्त “आत बोलावलं आहे” इतकंच बोलला. तर मी गेलो”.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

आणखी वाचा – अक्षराला तिच्या मित्राबरोबर पाहताच अधिपतीच्या मनात संशय, पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशयाचं वादळ, फुट पडणार

यापुढे त्याने असं म्हटलं की, “त्या गार्डने मला एका वाटेने आत नेलं आणि तिथे शंकर भगवानच समोर दिसले. मी तिथे जाऊन बसलो आणि तिथे पाठ आहे शंकर भगवानांची. तिथे भस्म वगैरे लावतात. तर मला नेमकं कळलं नाही. माझ्याकडून ते घडलं. पण नेमकं बोलवलं कुणी हे माहीत नाही. कदाचित मला वाटलं नाना सर (नाना पाटेकर) आत होते तर त्यांनी मला बोलावणं पाठवलं असेल. पण मी त्यांना नंतर विचारलं. तर तेसुद्धा मला “नाही अरे मी नाही बोलावलं” असं म्हणाले”.

आणखी वाचा – ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, लूकने वेधलं लक्ष, खास फोटो समोर

दरम्यान, नव्या वर्षात सिद्धार्थ व मिताली या दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्यांच्या ‘फसक्लास दाभाडे’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली. सिद्धार्थ-मितालीचा ‘फसक्लास दाभाडे’ हा एकत्र पहिला चित्रपट त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसालाच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Tags: Marathi actor Siddharth Chandekarsiddharth chandekarSiddharth Chandekar Kedarnath story
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Chhava Starcast Fees

'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तब्बल इतकं मानधन, तर रश्मिका मंदाना व अक्षय खन्नाची फी नक्की किती?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.