शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने खरेदी केली आलिशान कार, म्हणाला, “बायको मला तुझा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2023 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Siddharth Mitali New Car

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने खरेदी केली आलिशान कार, म्हणाला, "बायको मला तुझा…"

दिवाळीनिमत्त सर्वत्र धामधूम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सगळेचजण दिवाळी स्पेशल खरेदी करताना दिसत आहेत. कलाकार मंडळींनी दिवाळीनिमित्त घर, गाडी घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर ही केली आहे. अशातच आणखी एका मराठमोळ्या व लाडक्या कलाकार जोडीने गाडी खरेदी केली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. ही लोकप्रिय कलाकार जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर. (Siddharth Mitali New Car)

सिद्धार्थ चांदेकर सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी ‘झिम्मा २’ चित्रपटातील ‘मराठी पोरी…’ या गाण्यावर ठेका धरला होता. त्यांच्या या गाण्यावर थिरकतानाचा रील व्हिडीओ सोशल मीडियावरून अल्पावधीतच बराच व्हायरल झाला होता. सिद्धार्थ व मिताली यांचं नवरा बायकोच बॉण्डिंग किती स्पेशल आहे हे आपण नेहमीच पाहतो.

आणखी वाचा – “कधीही रील बनवून नाचली नाही पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचा धमाल डान्स, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आयुष्यात सारंकाही…”

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

सिद्धार्थ-मिताली कायमच एकमेकांना सपोर्ट करताना पाहायला मिळतात. तसेच बरेचदा ते परदेशातील ट्रिप एन्जॉय करताना ही दिसतात. याचे अनेक फोटो, व्हिडीओ ते सोशल मीडियावरून शेअर देखील करत असतात. अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थ-मिताली यांनी मिळून पहिली नवी कोरी आलिशान अशी गाडी खरेदी केली असल्याची गुडन्यूज त्यांनी शेअर केली आहे. आलिशान गाडीबरोबर फोटो काढत सिद्धार्थने पोस्ट शेअर केली आहे. “एकत्र मोठे होत आहोत! पहिली ऑटोमॅटिक गाडी एकत्र खरेदी केली. तुझा अभिमान आहे बायको! दिवाळीच्या शुभेच्छा”, असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. तर मितालीने ही गाडीबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट करत, “माझी लक्ष्मी आली” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने भांडुपच्या राहत्या चाळीतील ‘तो’ व्हिडिओ केला शेअर, एकाच गल्लीत दिव्यांची आरास, रांगोळी अन्…

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

मिताली व सिद्धार्थने दिवाळीचं औचित्य साधत ही पहिली नवी कोरी कार घेतली असल्याचं त्यांच्या कॅप्शनवरून कळतंय. तसेच सिद्धार्थने एकत्र गाडी खरेदी करायला मितालीने दिलेला सपोर्ट पाहता, तिचं कौतुक करत अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. सिद्धार्थ मितालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi actressmitali mayekarsiddharth chandekarsiddharth mitali new car
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Titeekshaa Tawde and Khushboo Tawde

"जिथे शाळा सुटल्यावर उनाडक्या करायचो…", दिवाळी पहाटला फडके रोडवरवरील कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या तितिक्षा तावडेची खास पोस्ट, म्हणाली, "आम्हा दोघींसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.