अभिनेता श्रेयस तळपदे हा गेली अनेक वर्षं मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी त्याने आवाज दिला होता. यामुळे त्याच्या अभिनयासह आवाजाचीही जोरदार चर्चा झाली. नुकत्याच आलेल्या पुष्पा-२ मुळेही तो सध्या चर्चेत आहे. श्रेयस तळपदेने केलेल्या या कामाचं खूप कौतुक झालं. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आजवर त्याने अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे अशातच त्याने नुकतंच एका मुलाखतीत फराह खान की कंगणा रणौत यांच्याबरोबर काम करण्याबद्दल सांगितले. (shreyas talpade on kangana ranaut and farah khan)
‘ओम शांती ओम’ चित्रपटामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. आजही हा चित्रपट व या चित्रपटातील श्रेयसची भूमिका अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटामधून प्रसिद्धी झोतात आलेला श्रेयस लवकरच आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने दिवंगत अटळ बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटाची दिग्दर्शिका अभिनेत्री कंगणा रणौत आहे. त्यामुळे नुकत्याच एका मुलाखतीत त्याने कंगणा व फराह यांच्याबरोबरच्या काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले.
आणखी वाचा – “दिखाव्यासाठी नाही तर…”, नवीन गाडी घेताच अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया, म्हणाली, “स्वतःचं अस्तित्त्व…”
नवभारतला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने असं म्हटलं की, “माझ्या मते दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो. त्याचा पुरुष किंवा स्त्री असण्याचा काहीही संबंध नाही. या दिग्दर्शकाचं ऐकायचं की नाही हे तुम्ही सेटवर पहिल्याच दिवशी ठरवता. हा दिग्दर्शक किती तयारीनिशी आला आहे, याची कल्पना येते. फराह खानची कथा सांगण्याची आणि चित्रपट बनवण्याची शैली वेगळी असली तरी ती पूर्ण तयारीनिशी सेटवर येते. तशाच प्रकारे कंगना मॅडमही पूर्ण तयारीनिशी सेटवर येत होत्या”.
यापुढे श्रेयस असं म्हणाला की, “सेटवर कंगणाने माझ्यापेक्षा अटलजींची जास्त तयारी केली होती. दिग्दर्शक पुरुष असो वा स्त्री, त्याची तयारी चोख असली पाहिजे. अनेक वेळा पुरुष दिग्दर्शक कमकुवत असल्याचे आणि त्यांची तयारी अपूर्ण असल्याचे समजते”. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रखडलेला कंगना रणौत हिचा’इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.