सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने स्वत:हूनच… ”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांनी सांगितलं गुरुचरण सिंहच्या शो सोडण्याचे नेमके कारण, म्हणाले, “अनेक समस्या…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Asit Modi Reveals the reason For Quitting Gurucharan Singh Tarak Mehta Ka Ooltah Chashma Show

‘तारक मेहता...’च्या निर्मात्यांनी सांगितलं गुरुचरण सिंहच्या शो सोडण्याचे नेमके कारण

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेले अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह यांनीही या शोमधून वर्षानुवर्षे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. मात्र नंतर तो शोमधून अचानक गायब झाला. जेनिफर मिस्त्रीला ज्या पद्धतीने बाहेर फेकले होते, त्याच पद्धतीने निर्मात्यांनी आपल्याला हाकलून दिल्याचा खुलासा त्याने केला होता. २०१२ मध्ये त्यांनी मला शोमधून रिप्लेस केलं. याबद्दल आता स्वत: निर्मात्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. निर्माते असित मोदी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना गुरुचरणच्या शोमधून बाहेर पडण्याचे खरे कारण सांगितले आहे. (asit modi on gurucharan singh)

याबद्दल असित मोदी यांनी सांगितले की, त्याचे आणि गुरुचरणचे जवळचे नाते आहे आणि त्याचे कुटुंबदेखील त्याच्यावर खूप प्रेम करते. याबद्दल ते असं म्हणाले की, “गुरुचरण हे खूप चांगले व्यक्ती आहेत आणि मी त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलेलो आहे. माझी पत्नी आणि मुले त्याच्यावर प्रेम करतात”. असित मोदी पुढे म्हणाले, “मधल्या काळात तो अनेक समस्यांमधून जात होता आणि मी त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करतो की, तो या कठीण परिस्थितीतून बाहेर येईल” निर्मात्याने पुढे खुलासा केला की, गुरुचरणने स्वतः शो सोडला आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता.

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

आणखी वाचा – “आवडी आली” म्हणत अंकिता वालावलकरने घेतली महागडी आलिशान कार, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला खास फोटो

याबद्दल असित मोदी म्हणाले की, “’गुरुचरणने स्वतःहून शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. आम्ही त्याला कधीही सोडण्यास सांगितले नाही. आता त्यालाही वाटतं की, तो या शोचा भाग व्हायला हवा होता आणि त्याला हा शो आवडतो”. असित मोदी पुढे म्हणाले की, “‘तारक मेहता…’ला १६ वर्षे झाली आहेत आणि शो सोडण्यामागे लोकांची वैयक्तिक कारणे आहेत आणि कोणीतरी तुमच्या शोचा कायमचा भाग असेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. बहुतेक कलाकार अजूनही संबंधित आहेत”.

आणखी वाचा – जुई गडकरीला करायचं आहे लग्न, होणाऱ्या नवऱ्याबाबत सांगितल्या अपेक्षा, म्हणाली, “प्रपोज न करता…”

दरम्यान, गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त नुकतंच समोर आले. यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. गेल्या १९ दिवसांपासून त्याने खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली.  

Tags: asit modi on gurucharan singhgurucharan singh aka sodhiTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
bigg boss Marathi 5 fame ankita walawalkar expressed her feelings After buying a new car post viral on social media

“दिखाव्यासाठी नाही तर…”, नवीन गाडी घेताच अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया, म्हणाली, “स्वतःचं अस्तित्त्व…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.