सध्या सर्वत्र महाकुंभ मेळाव्याची चर्चा सुरु आहे. हा मेळावा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक मानला जातो. दर १२ वर्षांनी या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावेळी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी यादरम्यान उत्तर प्रदेश येथील प्रयागराजच्या त्रिवेणी सांगमाच्या इथे या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. सरकारकडून मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. कडक सुरक्षा, राहण्याची उत्तम सोय, भाविकांच्या सर्व सोई या सगळ्याची व्यवस्थित सोय करण्यात आली आहे. अशातच आता या महाकुंभमेळाव्यात अनेक कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रणदेखील पाठवण्यात आलं आहे. तर आता कोणते कलाकार परफॉर्म करणार? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. (mahakumbha 2025)
सांस्कृतिक मंडळाच्या प्रेस रिलीजच्या रिपोर्टनुसार, शंकर महादेवन, कैलाश खेर व शान असे दिग्गज गायक कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसणार आहेत. पहिल्या दिवशी शंकर महादेवन परफॉर्मन्स करुन मेळाव्याची शानदार अशी सुरुवात करणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी मोहित चौहान परफॉर्मन्स करुन या कुंभमेळाव्याची सांगता करणार आहेत. याव्यतिरिक्त देशभरातून आलेले इतर कलाकारदेखील महाकुंभ मेळाव्यात आपली कला सादर करणार आहेत.
कैलाश खेर, शान मुखर्जी, हरीहरन,कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोवना नारायण, डॉ.एल सुब्रमण्यम, विक्रम घोष व मालीनी अवस्थि असे कलकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच मराठीमधील महेश काळे, राहुल देशपांडे, देवकी पंडित, सुभद्रा देसाई व सुरेश वाडकर यांचंदेखील सुमधुर संगीत ऐकायला मिळणार आहे. २७ जानेवारी रोजी शान परफॉर्म करणार आहे. १० फेब्रुवारी रोजी हरिहरन यांचा परफॉर्मन्स होणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी कैलाश खेर यांचा शो पाहता येणार आहे.
आणखी वाचा – फराह खान की कंगणा रणौत? तुझी आवडती दिग्दर्शिका कोण? श्रेयस तळपदे म्हणाला, “माझ्या मते…”
हे सगळे कार्यक्रम कुंभ मेळा मैदानात गंगा मंडपात पार पडणार आहेत. सांस्कृतिक नृत्य, संगीत, कला सादर केली जाणार आहे. यावेळी भक्त व या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं जाणार आहे. तसेच या ठिकाणी आध्यात्मिक व कलात्मक अनुभवाचे दर्शन घडवले जाणार आहे. १२ वर्षांनी हा महाकुंभ मेळावा आयोजित केला जात आहे. यामध्ये ४५ कोटी पेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे.