शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, शाही पध्दतीने पार पडला लग्नसोहळा, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2025 | 9:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Hemal Ingle got married photos and videos viral on social media

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री हेमल इंगळेच्या लग्नाची चर्चा सुरु होती. जोडप्याचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. तिच्या या साखरपुडा सोहळ्यानंतर अनेकांना सुखद धक्का बसला होता. तेव्हापासून अनेकजण अभिनेत्रीच्या लग्नाची वाट पाहत होते आणि अखेर तिने लग्नगाठ बांधली आहे. साखरपुडा सोहळा झाल्यानंतर गेल्या महिन्यात हेमलचं केळवण, ग्रहमख आणि मेहंदी असे विधी पार पडले आणि काल (२ जानेवारी) रोजी हेमल विवाहबंधनात अडकली. आपल्या लाघवी सौंदर्याने व सहजसुंदर अभिनयाने हेमलने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशी ही सुंदर अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकल्यामुळे अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Hemal Ingle Wedding)

हेमलने लग्नात गुलाबी रंगाचा छान, सुंदर असा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. या शिवाय या भरजरी लेहेंग्यावर मोकळे केस, गळ्यात नेकलेस आणि हातात चुडा असा सुंदर लूक केला होता. तर हेमलचा नवरा रौनक चोरडियाने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. दोघे या खास लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “माझं नाव वापरुन व्यवसाय करु नका”, मुंडावळ्या बनवणाऱ्या व्यक्तीवर भडकली अंकिता वालावलकर, म्हणाली, “खोटं बोलून…”

हेमल-रौनक यांचा विवाहसोहळा अगदी शाही पध्दतीने पार पडला. सोशल मीडियावर व्हायरल होत झालेल्या फोटो व व्हिडीमधून हे दोघे समुद्रकिनारी एका शांत ठिकाणी विवाहबंधनात अडकल्याचे दिसून येत आहे. हेमलने तिच्या लग्नात खास एन्ट्री घेतली. ‘आफ्रीन’ या गाण्यावर डान्स करत हेमलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी ती काहीशी भावुकही झाली आणि भावुक होताच रौनकने तिला सावरले. समुद्रकिनारी सुर्यास्ताच्या वेळेस हेमल-रौनक यांचा हा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.

आणखी वाचा – 03 January Horoscope : मिथुन आणि सिंह राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार नवीन संधी, जाणून घ्या…

दरम्यान, हेमलच्या कामाविषयी सांगायचं झालं तर, ती नुकतीच सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याआधी ती सचिन पिळगावकरांच्याच ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाततेही दिसली होती. हा तिच्या पदार्पणाचा चित्रपट होता. हेमलने नुकतंच लग्न केलं असून मनोरंजन सृष्टीतून तिच्यावर शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: hemal inglehemal ingle weddinghemal ingle wedding news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Marathi actor Siddharth Khirid proposed to his future wife in a filmy style and he reveal her girlfriend face

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने होणाऱ्या बायकोला गोव्यामध्ये केलं फिल्मी स्टाइल प्रपोज, दिसते इतकी सुंदर, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.