गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. तर काहींनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. यात एका अभिनेत्याचे नाव सामील झाले आहे आणि हा अभिनेता म्हणजे ‘फ्रेशर्स’ मालिका फेम सिद्धार्थ खिरीड. अभिनेता सिद्धार्थ खिरीडने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. २०२४ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या आगमन करताना सिद्धार्थने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंडसह रोमॅंटिक फोटो शेअर केला होता. मात्र तेव्हा त्याने तिचा चेहरा दाखवला नव्हता. (Siddharth Khirid Propose)
आता सिद्धार्थच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा समोर आला आहे. सिद्धार्थ खिरीडने आता त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचे खास फोटो शेअर करत तिची ओळखही उघड केली आहे. मैथिली असं तिचं नाव आहे. फिल्मी स्टाइल प्रपोज करत सिद्धार्थने मैथिलीबरोबरचा फोटो शेअर करत त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. “दोन ह्रदये, दोन देश, दोन व्यवसाय… आणि एक कायमची प्रेमकथा. पूर्ण प्रपोजल व्हिडीओ लवकरच तुमच्या भेटीला येईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ही अगदी परीकथा आहे”. असं म्हणत त्याने रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.
सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेता आपल्या होणाऱ्या पत्नीला अंगठी घालताना पाहायला मिळत आहे. सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या गर्लफ्रेंडच्या पाठमोऱ्या फोटोमुळे सिद्धार्थची ही गर्लफ्रेंड नक्की कोण? याची उत्सुकता लागली होती. तर सिद्धार्थची ही गर्लफ्रेंड मैथिली भोसेकर ही डेंटीस्ट आहे.तसचं तिला मॉडेलिंगचीही आवड आहे. अनेक स्पर्थांमध्ये तिनं सहभाग घेतला होता. इतकंच नाही तर पॅरिस फॅशन वीकमध्येही ती सहभागी झाली होती. मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२३ हा किताबही तिनं पटकावला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, शाही पध्दतीने पार पडला लग्नसोहळा, फोटो व्हायरल
दरम्यान, ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये सिद्धार्थ झळकलेला आहे. याशिवाय काही चित्रपटांमध्ये देखील सिद्धार्थने काम केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. आता वर्षाखेरीस अभिनेत्याने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत सोशल मीडियावर प्रेम व्यक्त केलं आहे.