झी मराठी वाहिनी वरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेतील ‘श्री’ या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घरक केले. त्याच्या या भूमिकेला अफाट लोकप्रियता मिळाली. शशांक हा उत्तम नट तर आहेच, पण तो एक सजग नागरिकदेखील आहे. शशांक हा अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या स्पष्टवक्तेपणा व निर्भीडपणामुळेदेखील तितकाच लोकप्रिय आहे. शशांक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
अभिनेता सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर समाजातील काही मुद्दे तो सोशल मीडियाद्वारे मांडत असतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो कायमच चर्चेत राहत असतो. अशातच त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शशांकने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.
“मस्ती करायला वय लागत नाही” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओत त्याचे आई-बाबा मज्जा करताना दिसत आहेत. या खास व्हिडीओबरोबरच त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. “आई बाबा, तुम्हाला लग्न-वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आता तुम्ही आजी-आजोबा झाला असलात तरी मनातून कायम, Kids Zone (बालपणातच) रहा” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – अजूनही रेल्वेमध्ये नोकरी करत होते अक्षया देवधरचे वडील, फोटो पोस्ट करत म्हणाली, “चाळीस वर्ष नोकरी केली आणि…”
दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अभिजीत खांडकेकर, संग्राम समेळ, अक्षर कोठारी, आशीष देशपांडे यांसारख्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या तो स्टार प्रवाह वरील ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय मुकादम हे पात्र साकारत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये खूपचं लोकप्रिय आहे.