काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांची. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. १८ नोव्हेंबरला प्रसाद व अमृता विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील खास क्षण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अमृता व प्रसाद दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Prasad Jawade Birthday)
आज प्रसादचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमृताने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोने त्याचे पन्नास वेगवेगळे मूड स्विंग शेअर केले आहेत. ‘हॅपी बर्थडे अहो’ असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रसादचे बदलणारे मूड स्विंग पाहायला मिळत आहेत.
अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादसाठी हा वाढदिवस अधिक खास असणार आहे, कारण लग्नानंतरचा त्याचा हा पहिला वाढदिवस आहे. अमृताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता व प्रसाद सध्या लग्नांनंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत. लग्नामुळे ही जोडी विशेष चर्चेत आली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात प्रसाद व अमृता यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं कालांतराने प्रेमात रूपांतर झालं. साखरपुडा सोहळा उरकत दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघांचा शाही विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. प्रसाद -अमृताच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते.