रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भाड्याच्या घरात राहणाऱ्या ‘बिग बॉस’ फेम अक्षय केळकरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “जमवाजमव, लोन आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 30, 2023 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kelkar New Home

Video : भाड्याच्या घरात राहणाऱ्या 'बिग बॉस' फेम अक्षय केळकरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "जमवाजमव, लोन आणि…"

सध्या सिनेसृष्टीतील बरेच कलाकार घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावरून याबाबतची पोस्ट वा फोटो शेअर करून कलाकारांनी ही गुडन्यूज शेअर केली आहे. अशातच आता काही दिवसांपूर्वी एका मराठमोळ्या अभिनेत्याने मुंबईत नवं घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली होती. हा मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय केळकर आहे. (Akshay Kelkar New Home)

मराठी ‘बिग बॉस’मुळे अक्षयला विशेष लोकप्रियता मिळाली. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर अक्षयने स्वतःच स्थान निर्माण केलं. सिनेसृष्टीत पाय घट्ट रोवून उभ्या असणाऱ्या या जिद्दी कलाकाराचं अखेर एक स्वप्न पूर्ण झालं आहे. अक्षयने नुकतंच मुंबईत घर घेतलं आहे. अक्षयने त्याच्या कळव्यातील जुन्या घराला निरोप दिला आहे. हा आनंद त्याने आधीच चाहत्यांसह शेअर केला होता. आता मात्र त्याने त्याच्या नव्या घराची झलक व्हिडिओमधून दाखवली आहे.

आणखी वाचा – अजूनही रेल्वेमध्ये नोकरी करत होते अक्षया देवधरचे वडील, फोटो पोस्ट करत म्हणाली, “चाळीस वर्ष नोकरी केली आणि…”

अक्षयने त्याच मुंबईत पहिलं स्वतःच घर घेतलं आहे. त्याच्या नवीन घराचा व्हिडीओ शेअर करत त्याने घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओखाली कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “माझं पहिलं घर ते ही मुंबईत. २०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच ‘घर’. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांबरोबर, म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो” असं त्याने म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

आणखी वाचा – अखेर रणदीप हुड्डा व लीन लैश्राम यांचा विवाहसोहळा संपन्न, लक्षवेधी पोशाख, पारंपरिक विधीने वेधले लक्ष

यापुढे त्याने लिहिलं आहे की, “स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा नजारा मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला पाहू शकतो. सगळी जमवाजमव, कागदपत्र, लोन, तयारी व खूप मोठी किचकट पण हवीहवीशी प्रक्रिया. म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद. ही सगळी प्रक्रिया पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला सकारात्मक दृष्टिकोन खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला. तर, आज माझ्या घराची चावी हातात आली. या वर्षाची सुरुवात व शेवट दोन्ही ‘विजेता’ अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे. तर अशाप्रकारे, मुंबईत स्वतःच घर झालं. मुंबईत स्वतःचं घर घेतल्याचा खूप आनंद होतोय” असं म्हणत त्याने त्याचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

Tags: akshay kelkarakshay kelkar new homeentertainmentmarathi actormarathi serialnew home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
marathi actor shashank ketkar shared special video for his parents wedding anniversary.

Video : अजूनही लहान मुलांचे खेळ खेळतात शशांक केतकरचे आई-वडील, नेटकऱ्यांनी केलं कौतुक, अभिनेता म्हणाला, "मस्ती करायला वय..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.